$type=ticker$snippet=hide$cate=0

कही खुशी, जादा गम

कोणत्याही अर्थसंकल्पाने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात. ते शक्यही नसते. सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापुढे तर जास्त आव्हा...


कोणत्याही अर्थसंकल्पाने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात. ते शक्यही नसते. सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापुढे तर जास्त आव्हान होते. गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या साथीमुळे तिजोरीत वीस लाख कोटी रुपयांहून अधिक मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे तो भरून काढून सर्वांचे समाधान करणे शक्य नव्हते; परंतु त्यातूनही चलाखी करता येते. अर्थमंत्र्यांनी ही चलाखी केली, ती सामान्य आणि मध्यमवर्गाच्या तसेच काही उच्च मध्यमवर्गाच्या खिशाला कात्री लावून. मद्य, सिगारेट तसेच आभूषणांसारख्या वस्तूंवर कर लावला, तर त्याला विरोध होण्याचे प्रमाण कमी असते. अति श्रीमंताच्या खिशातून काढून, सामान्यांच्या झोळीत टाकले, तर त्याचेही स्वागत होत असते; परंतु अर्थमंत्र्यांनी नेमके उलटे केले.
अर्थात गेल्या दोन वर्षांचे अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी गुंतवणूकदारांवरच कर लादल्याने भांडवली बाजाराने त्याचे नकारात्मक स्वागत केले होते. गेल्या वर्षभरात भांडवली बाजाराने नीचांकी 25 हजारांची आणि उच्चांकी पन्नास हजारांची पातळी गाठली होती. संस्थात्मक आणि सॉवरजिन गुंतवणुकीतून भारतात चांगली गुंतवणूक येत आहे. अशा वेळी पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकदारांचे समाधान यावर सरकारने भर दिला. त्याचा परिणाम गेल्या 24 वर्षांत प्रथमच भांडवली बाजाराने 2300 अंकाची उसळी घेऊन अर्थसंकल्पाला सलामी दिली. इंधनदरातील वाढीकडेही त्याने दुर्लक्ष केले. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधा, आरोग्य सेवांविषयी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पायाभूत क्षेत्रातील अर्थसंकल्पात वाढ झाली असून यामुळे जागतिक स्तरावरील सुविधांचा मार्ग मोकळा होईल; परंतु रोजगार आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नासारख्या मुद्द्यांवर परिस्थिती स्पष्ट नाही. कोरोनाच्या काळात आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली. त्यामुळे सरकारला आरोग्यावर अधिक तरतूद करणे भाग होते. तसे संकेतही मिळत होते. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली हे चांगले झाले; परंतु पूर्वीच्या अनुभवाचा विचार करता ही तरतूद आरोग्यावरच खर्च केली जाईल, याची खात्री नाही. इतर विभागाकडे नंतर ती वळविली जाणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेतून 70 हजार खेड्यांमध्ये आरोग्य केंद्रे बांधली जातील. कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आह; परंतु त्यासाठी सुमारे 65 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. खेड्यांमध्ये राहणार्‍या देशातील साठ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला याचा फायदा होईल. सरकारने रेल्वे, नवे राष्ट्रीय महामार्ग, कॉरिडॉरच्या घोषणा केल्या. त्यातही ज्या चार राज्यांत निवडणुका आहेत,त्यावर केंद्र सरकार मेहेरबान झाले आहे. महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्यापैकी नाशिक आणि नागपूर या दोन शहरांसाठी मेट्रोच्या घोषणा केल्या. सर्वाधिक कर देणार्‍या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसताना आसाम, पश्‍चिम बंगाल, केरळ, तमीळनाडू या राज्यांसाठील लाखो कोटी रुपये दिले. एकट्या तमीळनाडूतील विविध प्रकल्पांसाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली. सरकारने रेल्वे, बस, रस्ते आणि मेट्रोसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. शहरी भागात 20,000 नवीन बस चालवल्या जातील. टियर -2 शहरांमध्ये लाईट मेट्रो आणि निओ मेट्रो चालविल्या जातील. इटारसी-विजयवाडा दरम्यान फ्युचर रेडी कॉरिडॉर बांधला जाणार आहे. पुढच्या वर्षी 8500 किलोमीटर लांबीचे रस्ते प्रकल्प सुरू होतील. रस्ते मंत्रालयाला एक लाख 18 हजार कोटी, रेल्वेला एक लाख 15 हजार कोटी रुपये मिळाले. त्यामुळे देशवासीयांना चांगल्या आणि जागतिक दर्जाच्या परिवहन सेवा उपलब्ध होतील. कोरोनामुळे सरकारी उत्पन्न कमी झाले, तर खर्च वाढला. अशा परिस्थितीत प्राप्तिकरात वाढ अपेक्षित होती; परंतु सरकारने प्राप्तिकरात कोणतीही वाढ केलेली नाही. अर्थातच प्राप्तिकरात कोणतीही सवलत न दिल्याने 40 कोटींचा मध्यमवर्ग नाराज झाला आहे. अर्थात तो भाजपचा पाठिराखा असल्याने निवडणूकपूर्व अंदाजपत्रकात त्याला खुशीची गाजरे दाखविता येतील. 75 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना प्राप्तिकराचे परतावे भरण्यास सूट दिली आहे. देशात सुमारे सहा कोटी करदाते आहेत. त्यापैकी सुमारे तीन वैयक्तिक कर भरणारे आहेत. या निर्णयाचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल. पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांना निधी देण्यासाठी नवीन बँक तयार केली जाईल. सरकारने सोन्या-चांदीच्या आयातीवरील सीमाशुल्क कमी करून महिलांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचे दागिने स्वस्त आणि स्वयंपाक घरातील गॅस महाग असे सरकारचे धोरण आहे. एकीकडे पायाभूत सुविधा आणि विकासावर भर असे अर्थसंकल्पाचे स्वरुप असले, तरी दुसरीकडे रोजगाराविना विकास ही संकल्पना सरकार पुढे रेटते, की काय अशी शंका यावी, अशी स्थिती आहे. त्याचे कारण संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणात रोजगाराच्या  परिस्थितीवर भाष्य नाही. त्यामुळे लाखो तरुणांच्या नोकर्‍या व रोजगाराच्या स्वप्नांना मोठा फटका बसला आहे. सरकारने दीड लाख रोजगार जाहीर केले असले, तरी हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. शेती आणि ग्रामीण भागााच्या विकासावर भर असलेला अर्थसंकल्प असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे वर्णन केले असले, तरी प्रत्यक्षात आकडेवारीपेक्षा त्यात जास्त काही नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न कसे वाढविणार, हे स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या रकमेत वाढ नाही. कोणताही अर्थमंत्री सर्वांचे एकाच वेळी समाधान करू शकत नाही; परंतु जास्तीत जास्त घटकांचे समाधान करतो, तो खरा चलाख अर्थमंत्री. शिवाय ज्या भागातील अर्थमंत्री असतो, तो त्या भागातील बड्या साहित्यिकाच्या काही ओळी उद्धृत करीत असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या वेळचा अर्थसंकल्प सादर करताना हा पायंडा मोडला आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या काही काव्यपंक्ती सादर केल्या. त्याचा भावार्थ अजून पहाट व्हायची असली आणि सूर्योदय व्हायचा असला, तरी काही पक्ष्यांना त्याची अगोदरच चाहूल लागते आणि ते सूर्योदयाची वार्ता घेऊन येत असतात. आशेवर लोक जगतात; परंतु ही आशा किती काळ लावायची, हे ही पाहिले पाहिजे. चार छोट्या अर्थसंकल्पाएवढा खर्च केवळ पॅकेजवर केल्याचा दावा सीतारामण यांनी केला असला, तरी त्याचा किती फायदा झाला आणि अर्थव्यवस्था सुधारण्यात या पॅकेजचा वाटा किती हे त्यांनी सांगितलेले नाही. काही ठिकाणी कर लादून, दुसर्‍या घटकांना त्याचा फायदा द्यायचा असतो. अर्थमंत्र्यांपुढे दुसरा काही पर्याय नसतो; परंतु ज्या घटकाच्या खिशात हात घातला जातो, ते खिसे तेवढे सशक्त आहेत का, याचा विचार अर्थमंत्र्यांनी केलेला दिसत नाही. अति श्रीमंतांवर थोडा कर वाढवून त्याचा फायदा त्यांच्यापेक्षा दुर्बल असलेल्या मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्गाला देता आला असता; परंतु सरकारने ते धाडस दाखविले नाही. इंधन, मद्यावर लादलेल्या अधिभाराचा फटका ग्राहकांना बसणार नाही, त्याची तरतूद अगोदरच केली आहे, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले असले, तरी वस्तुस्थिती तशी दिसत नाही. खत, गॅस, रॉकेल, अन्न योजना आदींच्या अनुदानाला कात्री लावून सरकार कल्याणकारी योजनातून बाहेर पडते आहे. 






















 



Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11194,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,774,देश,4657,नाशिक,836,पुणे,934,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17944,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15343,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4324,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1695,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कही खुशी, जादा गम
कही खुशी, जादा गम
https://1.bp.blogspot.com/-qcOSTIF1V-w/YBgLjPpWnjI/AAAAAAABn0k/vZQ_Yxhb180iHUDRdkUI_qGv7jDUnRu2ACLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-qcOSTIF1V-w/YBgLjPpWnjI/AAAAAAABn0k/vZQ_Yxhb180iHUDRdkUI_qGv7jDUnRu2ACLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_91.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_91.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content