इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील गणेश भाजी मंडई, नगरपरिषदेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथे हलवण्याच्या दृष्टीने नगरपालिका प...
इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील गणेश भाजी मंडई, नगरपरिषदेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथे हलवण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने भाजीपाला व्यापार्यांना व शेतकर्यांना आव्हान केले होते. यावर शेतकरी, भाजीपाला व्यापारी व वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने इस्लामपूर पालिकेचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना आहे त्या ठिकाणी भाजी मंडई सुरू ठेवण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते.
या निवेदनावर नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होऊन स्थानिक नागरिकांना व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काटेकोर पालन व नियोजन करून भाजी मंडई भरविणे बाबतचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी व्यापारी व वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने निशिकांत भोसले-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
गणेश भाजी मंडई गेल्या अनेक दशकांपासून सकाळच्या वेळेत भरत असते. या ठिकाणी इस्लामपूर शहरासह तालुक्यातील अनेक शेतकरी व व्यापारी या ठिकाणी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असतात. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता नगरपरिषदेने शहरात ठिकठिकाणी भाजीपाला मार्केट उभा केले आहेत. गणेश मंडई येथील वाढती गर्दी पाहता स्थानिक नागरिकांच्या अडचणी पाहता व वाहतूक कोंडी पाहता सदरची मंडळी नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडइ या ठिकाणी हलवण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने शेतकरी व्यापारी यांना आव्हान केले होते. मात्र, वाळवा तालुका संघर्ष समितीच्यावतीने सदरची मंडइही व्यापारी, शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे आहे या मंडईला अनेक दशकांचा इतिहास आहे. तरी सदर मंडइ ही आहे त्या ठिकाणीच भरण्यात यावी असे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर नगरपालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होऊन त्या ठिकाणी भाजी मंडई भरणे बाबत निर्णय होऊन त्या परिसरातील स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राहील, वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊन भाजी मंडई आहे त्याठिकाणी भरण्यात आली.
आज सकाळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी गणेश भाजी मंडई या ठिकाणी भेट दिली. यावेळी सकारात्मक झालेल्या निर्णयाबद्दल शेतकरी, व्यापारी स्थानिक नागरिक व वाळवा तालुका संघर्ष समितीच्यावतीने निशिकांत भोसले पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी, व्यापारी व नागरीक यांच्याशी संवाद साधून वाहतूक कोंडी, स्वच्छता याची दक्षता घेण्याबाबत च्या सूचना केल्या. यावेळी नगरसेवक वैभव पवार, वाळवा तालुका संघर्ष समितीचे नेते शाकीर तांबोळी, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, भास्कर कदम, गजानन फल्ले, मन्सूर वाठारकर, अमित ओसवाल, रियाज पटेल, सुमंत कुलकर्णी, दस्तगीर मनेर, दयानंद कांबळे, विष्णू माळी आदींसह अन्य मान्यवर शेतकरी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील, नगरसेवक वैभवदादा पवार, नगरसेवक शकील सय्यद, नगरसेवक प्रदीप लोहार नगरसेविका अन्नपूर्णा फल्ले यांचे जाहीर आभार मानले.