$type=ticker$snippet=hide$cate=0

सातार्‍यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा खासदार उदयनराजे यांचा संकल्प

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशांतील सर्वात ...


सातारा / प्रतिनिधी
: छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशांतील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणार्‍या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. याच पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे यांनी दिल्ली येथे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. या भेटीत छत्रपती उदयनराजे यांनी लष्कर प्रमुख नरवणे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खास भेट म्हणून दिली. 

खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लष्कर प्रमुखांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. सातारा जिल्हा हा सैनिकांचा असून जिल्ह्यातील अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी छावणी उभारण्याली गेली तर ती जवानांच्या शौर्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असेल. ही छावणी जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा देणारी असेल. लष्कराच्या छावणीला पोषक असे वातावरण आणि सुविधा असल्यामुळे लष्कराकडून याचा नक्की विचार केला, जाईल अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.

लष्करी छावणीसाठी तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा ह्या सातारची भूमीत आयत्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्गासह रस्त्याचे जाळे, मुबलक जमीन आणि पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सैनिकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड किल्ले प्रेरणादायी आहेत. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही, असे खासदार उदयनराजे यांनी सांगितले. 

खा. उदयनराजे म्हणाले कि, सैनिकांच्या या जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जतन करता येईल. तसेच या छावणीमुळे जिल्ह्यातील तरुणांना आणि शेतकर्‍यांना व्यवसाय अथवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. ही छावणी सातारच्या वैभवात मोठी भर घालेल. 


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,4,Latest News Maharashtra satara,9,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11174,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,924,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,2,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15316,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4314,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातार्‍यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा खासदार उदयनराजे यांचा संकल्प
सातार्‍यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा खासदार उदयनराजे यांचा संकल्प
https://1.bp.blogspot.com/-WBNZM9liirs/YCvTFkf0nxI/AAAAAAABoRI/t5Fe2onAOncTNGnGIg2oHy5Gcdia5sz_ACLcBGAsYHQ/s320/16-4.jpg
https://1.bp.blogspot.com/-WBNZM9liirs/YCvTFkf0nxI/AAAAAAABoRI/t5Fe2onAOncTNGnGIg2oHy5Gcdia5sz_ACLcBGAsYHQ/s72-c/16-4.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_912.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_912.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content