नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील चौरीचौरा शताब्दी समारंभाचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्घाट...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील चौरीचौरा शताब्दी समारंभाचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्घाटन करतील. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी चौरी चौरा शताब्दीला समर्पित टपाल तिकीटाचे प्रकाशनही करतील. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखपूरचे माजी खासदार योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवी किशन राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकारी, लोक प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.
या संदर्भात ट्विटर द्वारे आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले , " चौरी चौराचे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे.सकाळी 11 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे चौरी चौरा शताब्दी समारंभाचे उद्घाटन करील. 4 फेब्रुवारी या दिवशी 'चौरी चौरा' घटनेला 100 वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ही ऐतिहासिक घटना आहे. उत्तर प्रदेश सरकारद्वारा राज्यातील सर्व 75 जिल्ह्यात 4 फेब्रुवारी 2021 पासून ते 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत आयोजित शताब्दी समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.