$type=ticker$snippet=hide$cate=0

आरसीएफ प्रकल्पबाधीत मच्छिमार बांधवांना सुविधा देण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी : डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई : थळ आणि नवगाव येथे मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी जेट्टी बांधणे, खोदकाम करताना निघणा-या दगडांचा वापर चॅनलच्या बाजूने बंधारा बांधण्यास...

मुंबई : थळ आणि नवगाव येथे मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी जेट्टी बांधणे, खोदकाम करताना निघणा-या दगडांचा वापर चॅनलच्या बाजूने बंधारा बांधण्यासाठी करणे,मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फटिलायझर्स (आरसीएफ) कंपनीसह मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाने कार्यवाही करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यां


नी दिले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या मच्छिमार बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिका-यांना अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मच्छिमार महिला आणि बांधवांच्या समस्या दूर करण्यासाठी बंदराकडे जाणा-या रस्त्यावर प्रसाधनगृहे पावसाळ्यापुर्वी उभारणे आवश्यक आहे. ही फिरती किंवा तात्पुरती सार्वजनिक शौचालये तातडीने आठ दिवसात उभारावीत. रसायनयुक्त सांडपाण्यामुळे प्रदुषण वाढून मासे मृत पावत असल्याचे स्थानिक आमदारांनी निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात सर्व्हे करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहे. याचबरोबर बोटी बांधण्यासाठी जेट्टी उभारण्यासंदर्भात उपलब्ध निधीतुन आरसीएफ ने कार्यवाही सुरू करावी. नाविन्यपुर्ण कामासाठी निधीतून मच्छिमार बांधवांसाठी सुविधा पुरविण्याची कामे करता येतील का यासंदर्भात अहवाल सादर करावा. या परिसरातील प्रकल्पबाधितांना मूलभुत सोयी-सुविधा पुरविणे अत्यावश्यक असल्याने या कामास गती द्यावी. मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या विभागाच्या अखत्यारित येणा-या कामांना गती देऊन ती पुर्ण करावी असे निर्देशही उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी दिले. बैठकीस विधानपरिषद सदस्य रमेश पाटील, विधानसभा सदस्य महेंद्र दळवी, मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित सैनी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, आरसीएफचे अध्यक्ष श्रीनिवास मुडगेडीकर, मुख्य किनारा अभियंता रूपा गिरासे, आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: आरसीएफ प्रकल्पबाधीत मच्छिमार बांधवांना सुविधा देण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी : डॉ. निलम गोऱ्हे
आरसीएफ प्रकल्पबाधीत मच्छिमार बांधवांना सुविधा देण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी : डॉ. निलम गोऱ्हे
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/ln/images/686x514/nilam-gorhe43-201808123605_202009107395.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_935.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_935.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content