नवी दिल्ली - देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज खासदार संजय राऊत गाझीपूर सीमेव...
नवी दिल्ली - देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज खासदार संजय राऊत गाझीपूर सीमेवर जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तसेच संजय राऊत यांच्या गाजीपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गाजीपूर सीमा वाहतुकीसाठी बंद केली आहे. सोबतच गाजीपूर सीमेवर खिळे आणि काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. तसेच येथील वाहतूक आनंद विहार, चिल्ला, डीएऩडी, अप्सरा, भोपरा और लोनी सीमांकडे वळवण्यात आली आहे. तर सिंघु सीमेवर सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहे.