केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय आयुर्विमा अर्थात एलआयसी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय आयुर्विमा अर्थात एलआयसी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा आयपीओ यावर्षी बाजारात येईल. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात एलआयसीच्या खासगीकरणाबाबत घोषणा करण्यात आली होती.
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग आयपीओ च्या माध्यमातून सरकारने आपली एलआयसीमधील भागीदारी विकण्याची घोषणा केली आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकून सरकार निधी उभा करण्याच्या विचारात आहे. अर्थसंकल्प सादर करताना सीतारामण यांनी भारत सरकार निर्गुंतवणुकीकरण करणार असणार्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. या वेळी त्यांनी एलआयसीच्या आयपीओबाबत माहिती दिली. आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाबाबतही त्यांनी घोषणा केली.एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणुकीमधून सरकार 90 हजार कोटींचा निधी उभा करण्याच्या विचारात आहे, तर इतर काही कंपन्यांबाबतदेखील निर्गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करत आहे. या माध्यमातून सरकार एक लाख वीस हजार कोटी उभे करण्याच्या तयारीत आहे. बीपीसीएल, कंटेनर कॉर्परेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया अँड एअर इंडिया या कंपन्यांमध्ये सरकार या वर्षी निर्गुंतवणूक करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.