$type=ticker$snippet=hide$cate=0

मैत्रीपर्व पुन्हा सुरू

जागतिक राजकारणात घडणार्‍या घटनांचा देशांच्या परराष्ट्रसंबंधावर परिणाम होत असतो. भारत आणि इराण या दोन देशांच्या मैत्रीबाबतही तसेच झाले. डोनाल...



जागतिक राजकारणात घडणार्‍या घटनांचा देशांच्या परराष्ट्रसंबंधावर परिणाम होत असतो. भारत आणि इराण या दोन देशांच्या मैत्रीबाबतही तसेच झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेवर निर्बंध घातले होते. त्याचा परिणाम भारत आणि इराणच्या मैत्रीवर झाला. अडचणीच्या काळात जो मित्र कायम साथ करतो, त्यांच्यातील मैत्रीपर्व दीर्घकाळ टिकते. अमेरिकेने चीन आणि भारताला इराणकडून कच्चे तेल आयात करण्यावर बंधने घातली. 

चीनने हे बंधन धुडकावले; परंतु भारताने अमेरिकेच्या मैत्रीखातर इराणकडून कच्चे तेल आयात करणे थांबविले. पाकिस्तान आणि चीनला शह देण्यासाठी भारत-इराण मैत्री महत्त्वाची होती. चाबहार बंदर विकसित करण्याचा भारत आणि इराणमध्ये करार झाला होता. त्यातून चीनने पाकिस्तानात बांधलेल्या ग्वादर बंदराला शह देण्याचा प्रयत्न होता. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात हा करार झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात हा करार पुढे नेण्यात आला; परंतु अमेरिकेशी जास्त मैत्री केल्यामुळे इराण भारतावर नाराज झाला. या नाराजीचा फायदा चीनने उठविला. अमेरिकेच्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या इराणला चीनने मदतीचा हात दिला. त्यामुळे भारताशी असलेला चाबहार बंदर करारातील काही भाग इराणने रद्द केला. पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि थेट मध्य पूर्वेत आणि अफगाणिस्तानात भारतीय वस्तू पाठविण्यासाठी या बंदराचे महत्व आहे. चीनमुळे भारताचा एक मित्र दुरावतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. भारत आणि इराणच्या मैत्रीत दरार निर्माण होणे भारताला व्यूहात्मकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्याचे कारण भारताला पूर्वी इराणकडून रुपयांत तेल मिळत होते. नैसर्गिक वायू पाईपलाईनने टाकण्याचा करार झाला होता. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतल्यानंतर भारताने इराणशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यावर का भर दिला हे समजण्यास मदत होते. रशियाहून परत येताना भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्येच इराणला थांबून चर्चा केली. त्याचे चांगले परिणाम भारत आणि इराण संबंधावर झालेले दिसतात. त्याचे कारण गेल्या 40 वर्षांत प्रथमच भारताच्या दौर्‍यावर इराणचे संरक्षणमंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हतामी आले होते. हतामी यांचा भारत दौरा अनेक अंगानी महत्वपूर्ण ठरला आहे. यामुळे भारत आणि इराणमधील संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. हतामी बंगळूरमध्ये झालेल्या एअरो-इंडिया 2021 मध्येदेखील सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. इस्त्राईल आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला असताना हतामी यांनी भारताचा दौरा केला.

भारत आणि इराणमध्ये चाबहार आणि झाहेदान रेल्वे लाईन प्रकल्प करार 2020 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकल्प चीनकडे जाईल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होता; मात्र हा प्रकल्प भारतासोबत करण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये इराणची चीनशी जवळीक वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात. या पार्श्‍वभूमीवर हतामी यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना भारत आणि इराण यांच्यातील संबंध ऐतिहासिक असल्यचे म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरक्षेसंबंधी काही करारदेखील झाले आहेत. भारत आणि इराणच्या सैन्याचे संयुक्त लष्करी सरावदेखील यापूर्वी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे इराणशी संबंध बिघडत चालले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तान भागात सर्जिकल स्ट्राईक केला होता. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधाविरोधात आणि पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी इराण भारताकडे मोठ्या आशेने पाहतो. हतामी यांचा भारत दौरा अमेरिका, पाकिस्तान आणि चीनसाठी विचार करायला लावणार आहे. राजनाथ सिंह यांच्या इराणच्या दौर्‍यावर होते, त्या वेळी त्यांनी हतामी यांना एअरो इंडिया 2021 चे आमंत्रण दिले होते. पश्‍चिम आशियातील देशांमधील संतुलन ठेवण्यामध्ये भारताची नेहमीच महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आखाती देश आणि इस्त्राईल यांच्याशी संबंध चांगले ठेवताना भारताला इराणसोबतही चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. भारतात गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील इस्त्रायली उच्चायुक्त कार्यालयाजवळ आयईडी ब्लास्ट झाला होता. भारतातील इस्त्रायली उच्चायुक्त रॉन माल्का यांनी त्याला दहशतवादी हल्ला म्हणत त्यामध्ये इराणचा कट असल्याचा संशय व्यक्त केला होता. इस्त्रायली दूतावासजवळ एक चिठ्ठी मिळाली होती, त्यामध्ये ‘साराल्लाह इंडिया हेजबोल्ला’ याच्याशी संबंधित मजकूर होता. गेल्या काही दिवसांमध्ये इस्त्राईलने आखाती देशांमध्ये आणखी एका देशाला मान्यता दिली होती. सध्या भारतासमोर यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. भारत आणि इराण यांच्यातील संबंधात याची कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. इराणच्या संरक्षणमंत्र्यांचा दौरा महत्वाचा समजला जातो आहे. ट्रम्प यांनी इराणवर लावेलेले निर्बंध जो बायडेन यांनी अद्याप हटवलेले नाहीत; परंतु ते हटविले जाण्याची शक्यता आहे. बायडेन यांचे धोरण सर्वस्पर्शी असते. त्यामुळे आज ना उद्या ते हटविले जातील. तसेच भारताला इराणकडून कच्चे तेल आयात करण्यावरचे बंधनहीव हटविले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर हतामी यांच्या दौर्‍याअगोदर पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून इराणने आपल्या व्यूहरचनेची दिशा स्पष्ट केली.

मध्ययुगीन प्रवासी अल बरुनी यांनी चाबहारला भारताचे प्रवेशद्वार म्हटले. चाबहार म्हणजे चार धबधबे, हे इराणचे एक नैसर्गिक बंदर आहे. बलुचिस्तानमध्ये चीनने बांधलेल्या ग्वादर बंदरापासून ते अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर आहे. खोल पाण्याचे हे बंदर जे मुख्य भूमीला जोडलेले आहे. इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सीस्तान-बलुचिस्तान प्रांतात वसलेले हे बंदर त्या मार्गाला जाणारा महत्त्वाचा दुवा आहे, ज्यामुळे भारत ते युरोपपर्यंत वाहतूक सुलभ होईल. स्वातंत्र्यापूर्वी अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमार्गे भारताचा मध्य आशियापर्यंत थेट प्रवेश होता; पण स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान मध्य आशियाशी थेट संबंध निर्माण करण्याच्या मार्गावर आला. आता मध्य आशियाशी संपर्क साधायचा असेल, तर पाकिस्तानच्या भूमीमार्गाने हे करावे लागेल; परंतु भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे हे शक्य झाले नाही. म्हणूनच भारत मध्य आशियातील पर्यायी मार्गाकडे पाहण्याचा बराच काळ प्रयत्न करीत आहे. चाबहार बंदराच्या विकासाची जबाबदारी जेव्हा भारताला देण्यात आली, तेव्हा भारताला मध्य आशियाशी संबंध जोडण्याच्या दृष्टीने आणखी वेग आला. चाबहारपासून भारत अफगाणिस्तानातल्या झारंज शहराच्या सीमारेषेशी आणि नंतर भारताने निर्मित झेरंज-डेलराम महामार्गाद्वारे, उत्तरेस मध्य आशिया आणि त्यापलीकडे जोडू शकतो. चाबहार बंदर भारताला मध्य आशिया आणि युरोपमध्ये प्रवेश मिळविण्यात मदत करू शकेल. मध्य आशियात जागतिक स्तरावर 67 अब्ज डॉलर्सची आयात बास्केट आहे आणि त्या जागतिक आयात बास्केटच्या 0.6 टक्क्यांहून कमी भारतीय निर्यात आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन मार्गिकेने इराणमार्गे भारताला बाह्य जगाशी व्यापार करण्याची परवानगी दिली; परंतु अतिशय निकटवर्ती शेजारी असूनही भारत अफगाणिस्तानाबरोबर असे करू शकला नाही. कारण अफगाणिस्तान हा या आयएनएसटीसी प्रकल्पात भाग नव्हता, ज्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले. 2016 मध्ये भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात चाबहार बंदरमार्गे तीन देशांमध्ये वाहतूक व व्यापार मार्ग विकसित करण्यासाठी आणि पाकिस्तानला मागे टाकण्यासाठी त्रिपक्षीय करार झाला. त्यानुसार चाबहार बंदराला तिन्ही देशातील व्यापाराचे मुख्य केंद्र बनवण्याचे ठरले आहे. यामुळे सेंट्रल आशिया आणि युरोपसाठी भारतातून शिपमेंट पाठवण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही अर्धाने कमी होणार. चाबहार पोर्टला चीनच्या वतीने पाकिस्तानमधील विकसित करण्यात येत असलेल्या ग्वादर पोर्टला उत्तर म्हणून पाहिले जाते. 


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5757,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,196,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,37,satara,138,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10310,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,704,देश,4433,नाशिक,803,पुणे,739,बीड,1437,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16395,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13630,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3696,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1548,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मैत्रीपर्व पुन्हा सुरू
मैत्रीपर्व पुन्हा सुरू
https://1.bp.blogspot.com/-WreTg7vzvQA/YCaMxEhUngI/AAAAAAABoLw/BEPDd3cojJUV9fMsEoSvfiPUtSTPdxIfACLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-WreTg7vzvQA/YCaMxEhUngI/AAAAAAABoLw/BEPDd3cojJUV9fMsEoSvfiPUtSTPdxIfACLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_954.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_954.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content