नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. पंजाबी अभिनेता दी...
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धू आणि इतर तिघांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोबतच हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींवर 50 हजारांचे बक्षीस ठेवले आहे.
सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपा
सत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीत हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता हिंसाचारात सहभागी असणाऱ्या 12 संशयित आरोपींची छायाचित्रे जाहीर केली आहेत. संशयितांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून 100 जणांना चौकशीची नोटीस धाडण्यात आली आहे.दिल्ली पोलिसांनी आंदोलनातील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत 44 एफआयआर दाखल केल्या असून १२२ जणांना अटक केली आहे. तर 9 प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आंदोलकांनी लाल किल्ल्यावरही कब्जा मिळवला होता. तसेच धार्मिक ध्वज फडकावला होता. दिल्लीतील अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्या. ट्रॅक्टर रॅलीला अचानक हिंसक वळण लागले होते. काही शेतकरी मोर्चाचा नियोजित मार्ग सोडून लाल किल्ल्याच्या दिशेने गेले होते. यात दिप सिद्धूचाही सहभाग होता. पाहता पाहता आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच निशाण ए साहीब हा शिखांचा धार्मिक ध्वज फडकावला. दीप सिद्धूने भडकावल्यामुळे आंदोलक लाल किल्ल्याकडे गेले होते अशी माहिती पुढे आलीय.