$type=ticker$snippet=hide$cate=0

देशाचा प्रमुखच जेव्हा खोटं बोलतो...

यशाचं श्रेय घ्यायला अनेक जण पुढं येत असतात; परंतु अपयशाची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार होत नाही. राजकारणात तर बुद्घीभेद केला जातो. पूर्वाश्रम...



यशाचं श्रेय घ्यायला अनेक जण पुढं येत असतात; परंतु अपयशाची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार होत नाही. राजकारणात तर बुद्घीभेद केला जातो. पूर्वाश्रमीच्या सरकारवर जबाबदारी ढकलून मोकळं होता येतं. आपली सत्ता आल्यानंतर किती काळ विरोधकांवर दोषारोप करीत बसायचं, याला काही मर्यादा असतात; परंतु नरेंद्र मोदी यांचं सरकार येऊन सात वर्ष व्हायला आली, तरी मोदी यांचं दोषपुराण चालू आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून सातत्यानं इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या वाढीचं समर्थन नीट करता आलं नाही, की मग चुकीचं बोलणं आलंच. पेट्रोलच्या दरानं शंभरी ओलांडली आहे. डिझेलच्या दरानं नव्वदीला स्पर्श केला आहे. त्यावरून देशभरात नाराजीचं वातावरण आहे. अगोदरच शेतकर्‍यांच्या आंदोलनानं सरकार कात्रीत सापडलं आहे. त्यात इंधन दरवाढीनं सरकारवर टीका व्हायला लागली आहे. त्यामुळं बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ आणि तेल उत्पादक राष्ट्रांनी (ओपेक) तेलाच्या उत्पादनात केलेली कपात यामुळं इंधनाच्या दरात वाढ होत आहे, असं सांंगितलं जात असलं, तरी ते अर्धसत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या सरकारवर जबाबदारी ढकलली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही तेच केलं. त्यांनी तर कोरोनामुळं वाहतूक खर्चात वाढ झाल्यानं पेट्रोल, डिझेल महागलं, असा जावईशोध लावला. किती कच्चं तेल आयात केलं जातं, याची आकडेवारी खासदार असलेल्यांना माहीत असू नये, याचं आश्‍चर्य वाटतं. त्यातल्या त्यात भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परिणामाची पर्वा न करता इंधन दरवाढीचं समर्थन करतानाही आता इंधनाला पर्यायी स्त्रोत निर्माण केलं पाहिजेत, असं जे मत मांडलं, ते महत्त्वाचं आहे. गडकरी फार वर्षांपासून इथेनॉलमिश्रित पेट्रोल, डिझेलचा पुरस्कार केला आहे. आता ते विजेवर चालणार्‍या वाहनांचा पुरस्कार करतात. मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या आकाशात झालेल्या किंमतीला मागील सरकारांच्या प्रमुखांवर दोष दिला. ते म्हणाले, होते की जर देशाला ऊर्जेमध्ये स्वावलंबी बनविण्याचं काम पूर्वी केलं गेलं असतं, तर आज भारताला जास्त कच्चं आयात करण्याची गरज भासली नव्हती, या मोदी म्हणण्यात तथ्यांश कमी आणि राजकारण जास्त आहे. मोदी यांचं सरकार येऊनही सात वर्षे होत आली असताना या काळात मोदी सरकारचे ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी करण्यात कुणी हात धरले होते का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 2019-20 या वर्षात भारतानं देशाला लागणार्‍या इंधनाच्या 85 टक्के  कच्चं तेल आणि 53 टक्के नैसर्गिक वायूची आयात केली. जागतिक बाजरात कच्च्या तेलाच्या प्रतिपिंपाची किंमत 63 डॉलरवर गेल्यामुळं सरकार दरवाढीचं खापर जागतिक भावावर फोडतं; परंतु जेव्हा 30-35 डॉलर प्रतिपिंप भाव होते, तेव्हाच्या दोन वर्षांत सरकारनं त्याचा फायदा सामान्य नागरिकांना दिला का, याचं उत्तर मोदी देत नाहीत. इंधनाच्या दराचा आणि राजकारणाचा फार जवळचा संबंध आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात दरात काही प्रमाणात सूट देण्यात आली. प्रदीर्घ काळ इंधन दरात वाढ करणं टाळलं होतं. आता पाच राज्यांच्या निवडणुका असल्या, तरी त्यात ओडिशा वगळता अन्य कोणत्याही राज्यांत भाजपची सत्ता नाही. सामान्य माणसाला वाटतं, की कच्च्या तेलाचे दर कमी झाले, की पेट्रोल, डिझेलचे दरही कमी होतील. त्याचं कारण कच्च्या तेलापासून डिझेल आणि पेट्रोल बनतं. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 63 डॉलर प्रतिपिंप असतानाही व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल सव्वा रुपये प्रतिलिटर या दरानं विकलं जातं. आपल्या शेजारच्या देशांतही इंधनाचे दर आपल्यापेक्षा कमी आहेत. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दराचा विचार करता भारतात भारतात अजूनही पेट्रोल तीस रुपये दरानं विकणं शक्य आहे. अर्थात तसं ते विकलं जाणार नाही. त्याचं कारण विक्रेत्यांचं कमिशन आणि केंद्र व राज्य सरकारच्या करांचा विचार त्यात केलेला नाही. मे 2014पासून इंधनाची मूळ किंमत 37 टक्क्यांनी घटली; पण खालच्या पातळीवरच्या दराचा लोकांना काही दिलासा देण्याएवजी राज्य सरकारांनी साधारणतः 67 टक्के कर वाढवला, तर केंद्र सरकारनं 217 टक्के वाढवला. एक देश, एक कर अशी भाषा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात वस्तू व सेवा करा (जीएसटी)तून इंधनाला दूर ठेवण्यात आलं. त्याचं कारण केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्यातून उत्पन्न हवं आहे. डॉ. विखे व मोदी यांना सामान्य नागरिकांना खरंच दिलासा द्यायचा असेल, तर अगोदर इंघन जीएसटीच्या कक्षेत आणावं. पेट्रोल, डिझेलवरचे वेगवेगळे अधिकार, राज्य व केंद्र सरकारचे कर कमी केले, तरी जागतिक बाजारातील सध्याचे भाव, विक्रेत्यांचे कमिशन जाऊनही पेट्रोल पन्नास रुपयांच्या आसपास देता येईल. पूर्वाश्रमीच्या नेत्यांवर टीका करण्याऐवजी हे करण्याची सरकारची तयारी आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलााचे भाव 35 डॉलरच्या आसपास असतानाही भारतात पेट्रोलचा भाव ऐंशी रुपये प्रतिलिटर होता आणि आता 63 डॉलर प्रतिपिंप असताना तो भाव शंभर रुपये प्रतिलिटर आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान असताना काही दिवस जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर काही दिवस 141 डॉलर प्रतिपिंप तर सरासरी भाव 120 डॉलर प्रतिपिंप असतानाही भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले नव्हते. हे विखे आणि मोदी यांना माहीत नाही, असं थोडंच आहे. डॉ. सिंग यांच्या काळातील भावापेक्षा सध्याचा जागतिक बाजारातील दर निम्माच असताना पेट्रोल आणि डिझेल जास्त दरानं विकलं जात आहे. याचा सरळसरळ अर्थ मोदी यांनी इंधन दरातून डॉ. सिंग यांच्या सरकारपेक्षा जास्त पैसे कमविले. मोदी प्रथम सत्तेत आले, तेव्हा म्हणजे 2014 मध्ये जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप 110 डॉलर होते, तेव्हा दिल्लीत पेट्रोल 71.41 रुपये प्रतिलिटर इतके होते. गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 64 डॉलर प्रतिपिंप होते. अगदी साधं गणित केलं, तरी मग पेट्रोल 42 रुपये प्रतिलिटर या भावानं मिळायला हवं; परंतु गुरुवारी ते 95 रुपये लिटरच्या आसपास होतं. पेट्रोलवर साठ टक्क्यांहून अधिक कर आहे. कर बाजूला ठेवून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती केल्या, तर दोन तृतियांशांनी भाव कमी होऊ शकतील. इंधन दरात वेगवेगळे अधिकार आणि कर हेच खलनायक आहेत. त्यांना दूर करून करात एकसमानता आणली, तरी सामान्यांचा खिसा हलका होण्याचं प्रमाण कमी होईल. गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्यांनी इंधनाच्या करातून 14 लाख कोटी रुपये कमविले. कोरोना काळात पेट्रोलवरील उत्पादनशुल्क 19.98 रुपयांवरून 32.98 रुपये केलं. डिझेलच्या बाबतीत हेच उत्पादनशुल्क 15.31 रुपयांवरून 31.83 रुपये केलं. या काळात अनेक राज्यांनी दोन्ही इंधनांवर मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविला. पेट्रोलच्या किंमतीत करांचा वाटा साठ टक्के, तर डिझेलच्या किंमतीत 55 टक्के आहे.‘आपण कसल्याच अपयशाला जबाबदार नाही; बरं घडलं ते मात्र माझ्यामुळे’, अशा मोदी यांची भूमिका दिसते. ‘पाच वर्षे द्या’ असं सांगून सत्ता मिळवलेल्यांना पुन्हा त्याचं खापर मागच्यांच्या डोक्यावरफोडणार असतील, तर या सरकारकडूनही काही भलं होणार नाही, याची खूणगाठ बांधली, तर फसगत आणि अपेक्षाभंगाचं दुःख तरी वाट्याला येणार नाही.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10355,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,708,देश,4453,नाशिक,805,पुणे,749,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16501,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13744,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3727,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1556,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: देशाचा प्रमुखच जेव्हा खोटं बोलतो...
देशाचा प्रमुखच जेव्हा खोटं बोलतो...
https://1.bp.blogspot.com/-o_fur33m03Q/YDILJvyv7UI/AAAAAAABock/kfVqZH34yywkcpJ60zjxtSV6S-dheofDACLcBGAsYHQ/s320/New%2BVindo%2Blogo.jpg
https://1.bp.blogspot.com/-o_fur33m03Q/YDILJvyv7UI/AAAAAAABock/kfVqZH34yywkcpJ60zjxtSV6S-dheofDACLcBGAsYHQ/s72-c/New%2BVindo%2Blogo.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_967.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_967.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content