पुणे/प्रतिनिधी: पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ, अशी ...
पुणे/प्रतिनिधी: पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या भेटीदरम्यान ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत मी लवकरच चर्चा करणार आहे, असे सांगून ते म्हणाले, की गेल्या काही दिवसांपूर्वी या विद्यापीठात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुर्णाकृती पुतळे आपण महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून बसवले आहेत. त्यामुळे आता सावित्रीबाई यांचे सुद्धा स्मारक होईलच. विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्याशीदेखील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा आणि स्मारकासंदर्भात आज चर्चा केली आहे. दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनावर देशातील सेलिब्रिटी एवढे दिवस का व्यक्त झाले नाही, असा प्रश्न भुजबख यांनी विचारला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे; पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावरही बोलायला हवे, असे त्यांनी व्यक्त केले.