$type=ticker$snippet=hide$cate=0

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला राजकीय वळण

पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्...

पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावे असे म्हटले आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. 


 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचे तिने नातेवाइकांना सांगितलं होते; पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणार्‍या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचे आयुष्य संपवले. पूजाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याची उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतरदेखील या आत्महत्येचे गूढ कायम असल्याने फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पूजाने ज्या वानवडी भागात आत्महत्या केली, त्या भागातील स्थानिक भाजप नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात घेतले जात असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सोखमोक्ष लावण्याची गरज असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. पूजा आणि तिच्या मित्राचे जसे राज्य सरकारमधील मंत्र्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आहेत, तसेच भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतदेखील फोटो आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे; परंतु पूजाच्या आईवडीलांनी अजूनपर्यंत गप्प राहणे पसंत केले; मात्र या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने पुणे पोलिसांनी स्वतः या प्रकणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10355,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,708,देश,4453,नाशिक,805,पुणे,749,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16501,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13744,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3727,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1556,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला राजकीय वळण
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला राजकीय वळण
https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11214338/WhatsApp-Image-2021-02-11-at-4.10.38-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_974.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_974.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content