$type=ticker$snippet=hide$cate=0

पंजाबमध्ये भाजपची धूळधाण

 देशभर काँग्रेसची पिछेहाट होत आहेत. निवडून आलेले आमदारही भाजपच्या कच्छपि लागत आहेत. असं असताना पंजाबनं मात्र काँग्रेसला उभारी दिली. जनतेनं क...


 देशभर काँग्रेसची पिछेहाट होत आहेत. निवडून आलेले आमदारही भाजपच्या कच्छपि लागत आहेत. असं असताना पंजाबनं मात्र काँग्रेसला उभारी दिली. जनतेनं काँग्रेसला निर्भेळ यश दिलं. इतकं की काही ठिकाणी कमळ उगवायलाही जागा उरली नाही. पुढच्या वर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याची रंगीत तालीम म्हणून महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीकडं पाहिलं जात होतं. तिथं भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला गेला.

कोणत्याही आंदोलनाला कमी लेखायचं नसतं. ते किती भागापुरतं मर्यादित आहे, यापेक्षा त्याचा प्रभाव अन्य भागात पडणार आहे, की नाही, याचा विचार करायचा असतो. शेतकर्‍यांचं आंंदोलन दोन राज्यापुरतं मर्यादित आहे. त्यात आंदोलनजीवी लोक शिरले आहेत, अशी शेतकरी आंदोलनाची टिंगल टवाळी केल्याचा परिणाम काय होतो, हे आता भाजपला पंजाबच्या जनतेनं चांगलंच दाखवून दिलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीनही कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यातही दिल्लीच्या आंदोलनाचं नेतृत्व शीख समुदायाकडं होतं. या आंदोलनात खलिस्तानवाद्यांचा भरणा आहे, आंदोलक देशद्रोही आहेत, असं सांगून झालं. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनाची खिल्ली उडविणं किती महागात पडलं, हे भाजपला चांगलंच कळलं असेल. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याअगोदर राज्यातील सात महापालिका आणि 109 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या सेमी फायनलमध्ये पंजाबमधील जनतेनं भाजपला धूळ चारली. अर्थात तिथं भाजप दुय्यम भूमिकेतच होता.  मागच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अकाली दलानं बहुतांश महानगरपालिका आणि नगरपालिका जिंकल्या होत्या. आता भाजप आणि अकाली दल वेगवेगळे लढले. कृषी कायद्यांना विरोध करीत हरसमिरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अकाली दल भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधून बाहेर पडलं; परंतु त्याचा फायदा अकाली दलाला झाला नाही. काँग्रेसनं इतकी मुसंडी मारली, की तीन महानगरपालिकांत भाजपला खातंही खोलता आलं नाही. पंजाबमध्ये गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. त्या राज्यातील मतदारांनी पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं मनोबल आणखी वाढविलं आहे. देशभर काँग्रेसचा पराभव होत असताना पंजाबमध्ये मात्र काँग्रेसनं इतर तीनही पक्षांना मोठी धोबीपछाड दिली. एका प्रभागात तर भाजपच्या उमेदवाराला अवघी नऊ मतं मिळाली. भाजप हा राष्ट्रीय पक्ष थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीवर शेतकरी आंदोलनाचा थेट परिणाम झाल्याचं दिसतं. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सत्तेतून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांच्या मतदारसंघात अकाली दल बॅकफुटवर आहे. सत्ताधारी काँग्रेसनं मात्र महापालिकांसह, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत बाजी मारली. सातपैकी सहा महापालिका जिंकणारा काँग्रेस पक्ष सातव्या महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, 109 पैकी बहुतांश नगरपालिकांतही पक्षानं बाजी मारली आहे.

या निवडणुकीत भाजपसह शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला. भटिंडा, होशियारपूर, कपूरथळा, अभोर, बाटला व पठाणकोट या महापालिकांमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला. मोगा महापालिकेत या पक्षाला बहुमतासाठी सहा जागा कमी पडल्या. भटिंडा महापालिकेत 53 वर्षांनी प्रथमच काँग्रेसच्या महापौराचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी ज्या महानगरपालिका निवडणुकीत अकाली दल, भाजपनं विजय मिळविला होता, त्या महापालिका, नगरपालिका अकाली दल, भाजपला टिकविता आल्या नाहीत. मोगा, होशियारपूर, भटिंडा तसंच पठाणकोट या महापालिका पूर्वी अकाली-दल भाजप युतीकडे होत्या. अभोर, बाटला तसंच कपूरथला इथं प्रथमच महापालिका निवडणूक झाली. नगरपालिका निवडणुकीतही 109 पैकी बहुतांश नगरपालिका जिंकत काँग्रेसनं विरोधकांचा धुव्वा उडवला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या काँग्रेसमध्ये या निवडणुकांच्या निकालामुळे नवचैतन्य पसरलं आहे. या आंदोलनातील बहुतांश शेतकरी पंजाब व हरियाणातील आहेत. एका वर्षांवर येऊन ठेपलेल्या पंजाब विधानसभा निवडणुका पुन्हा जिंकून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. पालिका निवडणुकीत भाजपबरोबरच शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षाला फटका बसला. या निवडणुकीत आम आदमी पक्ष मोठया ताकदीनं उतरला होता; मात्र या पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा फारच कमी झाली. भाजप, शिरोमणी आणि ‘आप’ यांसारख्या पक्षांच्या ‘नकारात्मक राजकारणाला’ जनतेनं नाकारलं आहे. आम्ही विकासाच्या मुद्दयावर निवडणुका लढलो. या विजयामुळं अधिक परिश्रम करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी व्यक्त केली. भाजपचे वर्चस्व राहिलेल्या पठाणकोटमध्ये काँग्रेसनं बाजी मारली. पठाणकोट महापालिकेत काँग्रेसनं 50 पैकी 37 जागा जिंकल्या. भाजपला केवळ 11 जागाच जिंकता आल्या. पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाबरोबर भटिंडा, होशियारपूरमध्ये असलेली सत्ताही भाजपनं गमावली. भटिंडामध्ये 50 जागांवर झालेल्या निवडणुकीत तब्बल 47 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे, तर अकाली दलाला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजप आणि आप तर इथं खातेही उघडू शकले नाहीत. अबोहर नगर पालिका निवडणुकीत 50 जागांपैकी काँग्रेसनं तब्बल 49 जागा जिंकल्या आहेत. अकाली दलाच्या वाट्याला फक्त एक जागा आली. अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मतदारसंघात काँग्रेसनं भाजपला चितपट केलं. सर्व 29 जागांवर काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या अभिमानानं निवडून दिलं होतं; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला कौल दिला आहे. होशियारपूरमध्ये 50 पैकी काँग्रेसनं 41 जागांवर विजय संपादन केला. तिथं भाजपला तीन, आपला दोन जागांवर समधान मानावं लागलं. शेतकरी आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागं हटणार नाहीत, अशी भूमिका मांडली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडली होती. त्यामुळं पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसतं आहे. जालंधरमध्येही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. फिल्लौर नगरपरिषदेत काँग्रेसनं 14 पैकी 11 जागांवर विजय मिळवला. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला एकाही जागावर यश आलं नाही. मोगा इथं भाजपला खातं उघडता आलेलं नाही; मात्र इथं शिरोमणी अकाली दल काँग्रेसच्या पुढं आहे. अकाली दलाला 15 तर काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला आहे. गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपच्या किरण कौर या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्यावर अवघी नऊ मतं मिळण्याची नामुष्की ओढावली. कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिलं होतं. याशिवाय, आमच्या सर्व शेजार्‍यांनीही मला मत देण्याचं वचन दिलं होतं. मग मला फक्त नऊ मतं पडूच कशी शकतात, असा सवाल कौर यांनी उपस्थित केला. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसनं मोठं यश मिळवलं. पालिकेच्या एकूण 2165 वॉर्डपैकी 1,399 वॉर्डात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळं निवडणूक झालेल्या आठपैकी सहा पालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकला. शेतकरी आंदोलनाचा परिणाम आता भाजप नेत्यांच्याही लक्षात आला. पक्षप्रमुख जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, खासदार आणि जिल्ह्या नेत्यांबरोबर चर्चा केली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय कृषिराज्यमंत्री संजीव बलियानसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तोमर आणि बलियान दोघं जाट समाजातून येतात. कृषी कायद्यामुळं शेतकर्‍यांना होणारे फायदे सांगण्याची मोहीम आणखी तीव्र करा. जेणेकरुन दिशाभूल करणार्‍यांना लोकांकडूनच उत्तर मिळेल अशी सूचना शाह यांनी बैठकीत पक्ष नेत्यांना केल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजप नेत्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे, त्याची पक्ष नेतृत्वाला माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. जाट समाजाच्या नाराजीचा या भागातील लोकसभेच्या 40 जागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं हे आंदोलन आणखी पसरणार नाही, याची भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांना खाप नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आलं आहे. कृषी कायद्यावरुन लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामधील भाजप पदाधिकार्‍यांना रणनीती बनवण्याची सूचना करण्यात आली आहे.

 


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5731,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,186,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,123,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10275,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,699,देश,4415,नाशिक,801,पुणे,722,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16288,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13505,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3655,विदेश,650,संपादकीय,1538,सातारा,3195,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पंजाबमध्ये भाजपची धूळधाण
पंजाबमध्ये भाजपची धूळधाण
https://1.bp.blogspot.com/-H5Q27Uu_npc/YC5G1EzM63I/AAAAAAABoUU/XCNY9Xd61L4vlx88b69BgGiTxFH2P0SyACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-H5Q27Uu_npc/YC5G1EzM63I/AAAAAAABoUU/XCNY9Xd61L4vlx88b69BgGiTxFH2P0SyACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_979.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_979.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content