सतीश कुंभार (इस्लामपूर / प्रतिनिधी) : महसूल विभागात गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेले येथील मंडल अधिकार्यांचे व तलाठ्यांचे भांडण चक्क ...
सतीश कुंभार (इस्लामपूर / प्रतिनिधी) : महसूल विभागात गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेले येथील मंडल अधिकार्यांचे व तलाठ्यांचे भांडण चक्क तहसिल कार्यालयापर्यंत पोहोचले. मंगळवारी रात्री या महाशयांची वरिष्ठ अधिकार्यांसमोरच जुंपली. एकमेकाच्या अंगावर जावून कपडे फाटेपर्यंत झटापट झाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या प्रकरणाने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
येथी
ल उरुण परिसरातील तलाठी कार्यालयाचे कैलास कोळेकर हे मंडल अधिकारी म्हणून तर अशोक लोनिष्टे हे तलाठी म्हणून काम पाहतात. नेमणुकीपासून या दोघांच्यात नोंदी व इतर काहीना ना काही कारणातून खटके उडत होते. सर्वासमोर दोघांच्यात मारामारीचे दोन वेळा प्रकारही घडले आहेत. या दोघांचे हे भांडण तालुका महसूल विभागात चांगलेच चर्चेत आहे. तरीही वरिष्ठांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला नाही.
मंगळवारी रात्री तहसिल कार्यालयातच पुन्हा हे दोघे एकमेकांना भिडले. महिला नायब तहसीलदारांच्यासमोरच ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामध्ये कपडेही फाटले. त्यांच्या काही सहकार्यांनी हे भांडण मिटवले. मात्र, तहसील कार्यालयातच झालेल्या दोन शासकीय कर्मचार्यांच्या या भांडणामुळे चांगलीच खळखळ माजली. याप्रकरणी तलाठी अशोक लोनिष्ठे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात थांबून होते. या प्रकारानंतर महसूलचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात ते पहावे लागेल.