नवी दिल्ली : उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची माहिती दिली. ट्विटर द्वारे अमित शाह म्हणाले, " ...
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची माहिती दिली. ट्विटर द्वारे अमित शाह म्हणाले, " उत्तराखंडच्या नैसर्गीक आपत्तीवर मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, भारत-तिबेट सीमा पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या महासंचालकांशी संपर्क साधला. सर्व संबंधित अधिकारी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धस्तरावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चमू निवारण कार्य करण्यासाठी निघालेल्या असून देवभूमीला सर्व प्रकारची मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या आणखी काही चमू दिल्लीहून आकाशमार्गाने उत्तराखंडला पाठविल्या जात आहेत. येथील परिस्तिथीवर आमचे निरंतर लक्ष आहे."
तर आसाम दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही देवभूमीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आसाम दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि अन्य उच्च अधिका-यांशी संपर्क साधत एकंदर परिस्थितीची माहिती घेतली. यासोबत त्यांनी घटनास्थळावर सुरू निवारण आणि बचाव अभियानाची माहिती घेतली. स्थानिक अधिकारी आणि प्रशासन नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कार्यरत आहेत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर द्वारे दिली.