$type=ticker$snippet=hide$cate=0

नगर अर्बन बँकेचे माजी संचालक सुरपुरियांना अटक ; 22 कोटीचे फसवणूक प्रकरण, आणखी एकाला घेतले ताब्यात

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या पिंपरी चिंचवड (पुणे) शाखेतील 22 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी बँकेचे सं...

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या पिंपरी चिंचवड (पुणे) शाखेतील 22 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी बँकेचे संचालक व माजी उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया यांना तसेच यज्ञेश चव्हाण या दोघांना अटक केल्याची माहिती पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या माजी संचालकाला अटक केली. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर तत्कालीन संचालकांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या कारवाईने शहरातील बँकींग वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेची 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तशी तक्रार पिंपरी चिंचवड पोलिसात देण्यात आली आहे. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान पॉवर हाऊस चौक, चिंचवड येथील बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला होता. याप्रकरणी बँकेच्या कर्ज उपसमितीचे सदस्य व बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहाजणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), व्हॅल्युअर अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर) यांच्यासह कर्ज उपसमितीचे सदस्य व बँकेचे संचालक मंडळ सदस्य, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय 56, रा.नगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.

पथक पहाटेच नगरला धडकले

या गुन्ह्यात बँकेचे तत्कालीन संचालक मंडळही आरोपी असल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक शनिवारी पहाटेच नगरमध्ये दाखल झाले. याप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड सुरू करण्याचे नियोजन त्यांचे आहे. पोलिस येणार असल्याची माहिती मिळाल्याने माजी संचालकांपैकी अनेकजण फरार झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईत बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेले असून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे पथके नगरला आल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी शोध मोहीम राबविली व दोघांना अटक केली.


अधिकार्‍यांचीही चौकशी

माजी संचालक नवनीत सुरपुरिया तसेच यज्ञेश चव्हाण या दोघांना पोलिसांनी अटक केेली आहे. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. पथकाने त्यांच्या घरी जाऊन शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. आमचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आमचे एक पथक नगरमध्येच असून अर्बन बँकेच्या अधिकार्‍यांचीही चौकशी केली जाणार आहे, असे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नगर अर्बन बँकेचे माजी संचालक सुरपुरियांना अटक ; 22 कोटीचे फसवणूक प्रकरण, आणखी एकाला घेतले ताब्यात
नगर अर्बन बँकेचे माजी संचालक सुरपुरियांना अटक ; 22 कोटीचे फसवणूक प्रकरण, आणखी एकाला घेतले ताब्यात
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/news-story/cover-images/4Nagar_Urban_Multistate_Co_O.jpg?k7LK___PPkwLXBe1lpjr6MLuSOZ.kaU8
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/22.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/22.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content