$type=ticker$snippet=hide$cate=0

एलआयसीचे भागभांडवल 25 हजार कोटी करणार

 मुंबई/प्रतिनिधी : केंद्र सरकार जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) आधी मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. एलआयसीचे अधि...

 मुंबई/प्रतिनिधी : केंद्र सरकार जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) आधी मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. एलआयसीचे अधिकृत भांडवल 25 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. पुढील आर्थिक वर्षात देशातील सर्वांत मोठ्या असलेल्या एलआससीचा आयपीओ आणण्याचा सरकारचा विचार आहे. एलआयसीची सुरुवात 1956 मध्ये पाच कोटींच्या आरंभिक भांडवलाने झाली. सध्या एलआयसीचे मालमत्ता मूल्य 31 लाख 96 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.  


जीवन विमा महामंडळाच्या 1956 मधील अधिनियमातील बदलांनुसार 25 हजार कोटींचे अधिकृत भाग भांडवल शंभर रुपये प्रतियुनिट दराने 2500 कोटी शेअर्समध्ये विभागले जाईल. प्रस्तावित बदलांनुसार यादीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र संचालकांचे पॅनेल तयार केले जाईल. आयपीओनंतर पहिल्या पाच वर्षांत सरकारचा 75 टक्के हिस्सा असेल. जीवन विमा महामंडळ अधिनियम 1956 मध्ये सरकारने एकूण 27 बदलांचा प्रस्ताव दिला आहे. पाच वर्षानंतर सरकार आपला हिस्सा कमी करेल; पण तो कमीतकमी 51 टक्के होईल. आयपीओनंतरही सरकारचा एलआयसीमध्ये मोठा वाटा असेल. तसेच कंपनीचे व्यवस्थापनदेखील पॉलिसीधारकांचे हीत लक्षात घेऊन सरकारकडे राहील. 2021 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले होते, की एलआयसीचा आयपीओ नव्या आर्थिक वर्षात येईल. एलआयसीमध्ये सध्या सरकारची शंभर टक्के भागीदारी आहे. यादी केल्यावर असे मानले जाते, की बाजार भांडवलाच्या बाबतीत एलआयसी ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनू शकते. कंपनीची मार्केट कॅप आठ-दहा लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. डीआयपीएएम सरकारी कंपन्यांमधील सरकारची भागीदारी सांभाळते. डेलॉय आणि एसबीआय कॅप्सची प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अ‍ॅडव्हायझर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे एक लाख 75 हजार कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये सरकारी भागभांडवल विक्री करून सुमारे एक लाख कोटी रुपये उभे करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीद्वारे 75 हजार कोटी रुपयांची रक्कम उभी केली जाईल.


Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11716,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,808,देश,4760,नगर,4,नाशिक,850,पुणे,1047,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18666,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16232,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4535,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1768,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: एलआयसीचे भागभांडवल 25 हजार कोटी करणार
एलआयसीचे भागभांडवल 25 हजार कोटी करणार
https://new-img.patrika.com/upload/2020/03/17/lic_5932119_835x547-m.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/25_9.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/25_9.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content