$type=ticker$snippet=hide$cate=0

भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही 30 हजार कोटींची बनू शकते : गडकरी

  नागपूर : बांबूपासून अनेक प्रकारचे साहित्य बनविले जात आहे. अगरबत्तींच्या काड्या, फर्निचर, कापड, बायो इथेनॉल आणि बांधकाम क्षेत्रातही बांबूचा...

 




नागपूर : बांबूपासून अनेक प्रकारचे साहित्य बनविले जात आहे. अगरबत्तींच्या काड्या, फर्निचर, कापड, बायो इथेनॉल आणि बांधकाम क्षेत्रातही बांबूचा मोठ्या प्रमाणात होणारा उपयोग लक्षात घेता भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही 30 हजार कोटींची बनू शकते असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) तर्फे बांबू तंत्रज्ञान, साहित्य आणि सेवा या विषयावरील आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, बांबूच्या आपल्याकडे 180 जाती आहेत. चीनमध्ये त्या 360 आहेत. पण आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने कोणती जात आवश्यक आहे, त्यावर संशोधन करून त्या जातीच्या बांबूची लागवड झाली पाहिजे. बांबूपासून आकर्षक साहित्य बनविले जाते. या साहित्याची मागणी वाढवली तर बांबूची लागवड आणि उत्पादन वाढेल. न्यूज प्रिंटसाठी लागणारा बांबू आपल्याला आयात करावा लागतो. या बांबूची लागवड देशात करून न्यूज प्रिंटची आयात कमी करता येऊ शकते काय, यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. उत्तर-पूर्व भारतातील राज्यांमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या बनविण्याचा उद्योग आहे. या भागातून 4 हजार टन काड्या देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठविल्या जाऊ शकतात, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या काड्या बनविताना बांबूपासून निघणार्‍या कचर्‍यापासून 'ऑरगॅनिक कार्बन' बनविता येतो. हा ऑर्गेनिक कार्बन शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला आहे. यामुळे शेतकर्‍याचे उत्पन्न अनेक पटींनी वाढल्याचे सिध्द झाले आहे. तसेच बांबूच्या (वेस्ट) कचर्‍यापासून बायो इथेनॉल बनते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये बायो इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरु होऊ शकतात. इंडियन ऑईल कंपनीने या भागात बायो इथेनॉलचा एक प्रकल्प सुरु केला आहे. गुजरातमध्ये एका कंपनीने बांबू आणि कॉटन मिळून सुंदर कापड तयार केले आहे. तसेच महामार्ग बांधताना रस्त्याशेजारी 'क्रॅश बॅरियर'साठी बांबूचा उपयोग भविष्यात होणार आहे. बांबूच्या अशा सर्व उद्योगांना एमएसएमईतर्फे प्रोत्साहन आणि मदत करण्याची आमची भूमिका असून भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था 30 हजार कोटींची बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5970,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,400,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,294,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10847,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17467,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14775,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही 30 हजार कोटींची बनू शकते : गडकरी
भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही 30 हजार कोटींची बनू शकते : गडकरी
https://m.economictimes.com/thumb/msid-55355659,width-1200,height-900,resizemode-4,imgsize-57981/delhi-pollution-impacted-my-health-nitin-gadkari.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/30.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/30.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content