मुंबई : शुक्रवारी रात्री अचानक व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा बंद झाल्याने वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागला. व्हॉट्सअॅप आणि इन्स्ट...
मुंबई : शुक्रवारी रात्री अचानक व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा बंद झाल्याने वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागला. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना तब्बल 40 मिनिटे हा त्रास सहन करावा लागला. रात्री अकराच्या सुमारास बर्याच व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी मेसेज पाठविण्यात आणि प्राप्त करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली.
व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी ट्विटरवर याबद्दल तक्रार करत अनेक मीम्स शेअर केले. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन असा ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात झाली. व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची सेवा अचानक का बंद झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीकडून अजूनही कोणती माहिती समोर आली नाही.