पाटण / प्रतिनिधी : मंगळवारी रोजी चाफळ विभागातील वाघजाईवाडी (डेरवण) येथील खाजगी रानात वणवा लावल्याप्रकरणी वनविभागाने एकास अटक करून पाटण येथी...
पाटण / प्रतिनिधी : मंगळवारी रोजी चाफळ विभागातील वाघजाईवाडी (डेरवण) येथील खाजगी रानात वणवा लावल्याप्रकरणी वनविभागाने एकास अटक करून पाटण येथील न्यायालयात हजर केले असता त्यास 5 हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती पाटण वनविभागाचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघजाईवाडी येथील खाजगी रानात वणवा लागल्याची माहिती कळताच वनकर्मचारी व ग्रामस्थांनी त्वरित जाऊन आग आटोक्यात आणली. याप्रकरणी आरोपी संजय रामचंद्र महिपाल (वय 55, रा. वाघजाईवाडी) यास वनविभागाने ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर केला असता त्यास 5 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. या कारवाईसाठी पाटणचे वनक्षेत्रपाल विलासराव काळे, मल्हारपेठचे वनपाल एस. बी. भाट, चाफळचे वनरक्षक विलास वाघमारे यांच्यासह वनमजुरांनी परिश्रम घेतले.
जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे संवधन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही उपद्रवी व्यक्तींकडून गावालगतच्या जंगल, डोंगरांना वणवे लावले जात आहेत. यामुळे वनसंपदा जळून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पर्यावरणाचा र्हास होत आहे. ग्रामस्थांनी वणवे लावणार्या व्यक्तीची माहिती वनविभाग द्यावी, असे आवाहन पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी केले आहे.