$type=ticker$snippet=hide$cate=0

कोयना धरण्याच्या लिफ्टमध्ये मिळाला 7 फुटाचा साप

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या भिंतीमध्ये असलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सापाला सर्पमित्रांकडून ...


इस्लामपूर / प्रतिनिधी :
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या भिंतीमध्ये असलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सापाला सर्पमित्रांकडून जीवदान देण्यात यश आले.

कोयना धरणाच्या भिंतीमध्ये कर्मचार्‍यांना वर खाली ये-जा करण्यासाठी असलेल्या लिफ्टमध्ये तिथे काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना एक साप दिसला. सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी सर्पमित्र निखिल मोहिते यांना कळवली. ही गोष्ट कळताच निखिल मोहिते, विकास माने व अश्‍वजित जाधव हे त्याठिकाणी पोहचले. साप लिफ्टमध्ये अडकला असल्यामुळे लिफ्ट बंध ठेवण्यात आली होती. त्यामुळे तब्बल 200 पायर्‍या उतरत भिंतीच्या आत असलेल्या 14 व्या मजल्यावर सगळे पोहचले. साप अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अवघड होते. साप बिनविषारी धामण या जातीचा असल्यामुळे निखिल यांनी हात घालून त्याला अलगत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण साप बाहेर आला नाही. त्यातच सापाच्या अंगाला लिफ्टचे ग्रीस लागल्यामुळे तो निसटत होता. नंतर साप हळूहळू खाली सरकू लागला व तो भिंतीतील सर्वात खालच्या तळघरात गेला. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा 4 मजले उतरून जावे लागले. विकास माने यांनी तळघरात उतरून साप बाहेर काढून निखिल यांच्याकडे दिला. त्याला सुखरूप एका पिशवीमध्ये पकडून सुरक्षित निसर्गात सोडण्यात आले.

सर्पमित्र अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सापांना वाचवण्याचे काम करत असतात. पण कायद्याआडून त्यांना अनेक वेळा बोलले जाते. तसेच काही तोतया सर्पमित्रांकडून चुकीच्या पध्दतीने साप पकडून सापांना त्रास दिला जातो. तसेच साप पकडण्याच्या नावाखाली सामान्य जनतेकडून गरजेपेक्षा जास्त पैशाची मागणी केली जाते. हे सर्व थांबून सर्पमित्रांची कायदेशीर नोंदणी करण्यात यावी. तसेच एखाद्या घरात साप आला तर पहिल्यादा जवळच्या वनविभाग कार्यालयात फोन यावा, फोन केलेल्या व्यक्तीचे नाव, नंबर व पत्ता कार्यालयात नोंद करण्यात यावे. वनविभाग कार्यालयातून नोंदणीकृत सर्पमित्रांना कळवण्यात यावं. तसेच पकडलेला साप त्याच दिवशी वनविभाग कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली सोडण्यात यावा. यासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्पमित्र 23 मार्च रोजी मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत. या मागण्यांचा 45 दिवसात विचार नाही केल्यास सगळीकडे काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच येणारे सर्व फोन वनविभाग कार्यालयाकडे वळविण्यात येणार आहे, असे यावेळी सर्पमित्र विकास माने व निखिल मोहिते यांनी सांगितले.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोयना धरण्याच्या लिफ्टमध्ये मिळाला 7 फुटाचा साप
कोयना धरण्याच्या लिफ्टमध्ये मिळाला 7 फुटाचा साप
https://1.bp.blogspot.com/-7avykDJO9FQ/YE8-Vvse4-I/AAAAAAABo-w/qN3UqoBHTNsQ-Brvle_KybRhQ9uocn9hwCLcBGAsYHQ/s320/14-6.jpg
https://1.bp.blogspot.com/-7avykDJO9FQ/YE8-Vvse4-I/AAAAAAABo-w/qN3UqoBHTNsQ-Brvle_KybRhQ9uocn9hwCLcBGAsYHQ/s72-c/14-6.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/7.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/7.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content