$type=ticker$snippet=hide$cate=0

शेतकर्‍यांनी भरले 70 कोटी ; कृषी पंप थकबाकी कमी झाल्याने नव्याने कनेक्शन्स जोडणी सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गत कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरु झली असून, नगर जिल्ह्यात 2 हजार कृषिपंपांच्या नवीन व...

अहमदनगर/प्रतिनिधी : महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गत कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरु झली असून, नगर जिल्ह्यात 2 हजार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, 1 लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी कृषीपंप थकबाकीपोटी 70 कोटी रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020ची अंमलबजावणी अहमदनगर मंडळात गतीने सुरु असून यामध्ये अहमदनगर मंडळात एकूण 2 हजार 39 कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या 1 हजार 774 जोडण्यांचा समावेश आहे. तर या योजनेअंतर्गत अहमदनगर मंडळात 1 लाख 10 हजार 930 शेतकर्‍यांनी कृषीपंप थकबाकीपोटी 70 कोटी रुपयांचा भरणा करून योजनेचा लाभ घेतला आहे.  


कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पुरेशी असल्यास तेथून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहेत. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे, त्यांनाही नियमित करून घेऊन नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पुरेशी नाही, त्या रोहित्रांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक तांत्रिक बदलाचे काम सुरू करण्यात आले आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून 30 मीटरच्या आत अंतर असलेल्या अहमदनगर मंडळामध्ये 1774 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.तर इतर योजनेतून सुद्धा जिल्ह्यात कृषिपंपांच्या 950 जोडण्या या कालावधीत देण्यात आल्या आहेत. नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून अहमदनगर मंडलात 1 लाख 10 हजार 930 शेतकर्‍यांनी थकबाकीपोटी 70 कोटी 7 लाख रुपयांचा भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ मंडळातील सर्वच शेतकर्‍यांनी घेण्याचे आवाहन नगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे. राज्यात 1 एप्रिल 2018 नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 प्रत्यक्षात आले आहे. या अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून 30 मीटर व 200 मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून 600 मीटरपर्यत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीतजास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीपासून 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. महावितरणने कृषिपंप नवीन वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलत तसेच इतर मुद्द्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र वेब पोर्टलची निर्मिती केली आहे. तसेच ज्या कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांना ऑनलाईनद्वारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर या वेबपोर्टलची लिंक देण्यात आली आहे.

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेतकर्‍यांनी भरले 70 कोटी ; कृषी पंप थकबाकी कमी झाल्याने नव्याने कनेक्शन्स जोडणी सुरू
शेतकर्‍यांनी भरले 70 कोटी ; कृषी पंप थकबाकी कमी झाल्याने नव्याने कनेक्शन्स जोडणी सुरू
https://s3.ap-southeast-1.amazonaws.com/images.asianage.com/images/aa-Cover-2cpf2877te3jtfv2b44f116t07-20180526063238.Medi.jpeg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/70.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/70.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content