$type=ticker$snippet=hide$cate=0

दोन ठिकाणी सत्तांतर, तीन ठिकाणी ’जैसे थे’!

निवडणूकपूर्व मतचाचण्यांचे निष्कर्ष कधी कधी चुकतात. कधी कधी ते अचूक येतात. मतचाचण्यांचं हे शास्त्र आता भारतात बर्‍यापैकी प्रगत झालं आहे. किती...


निवडणूकपूर्व मतचाचण्यांचे निष्कर्ष कधी कधी चुकतात. कधी कधी ते अचूक येतात. मतचाचण्यांचं हे शास्त्र आता भारतात बर्‍यापैकी प्रगत झालं आहे. किती लोकांशी प्रत्यक्ष बोललं, किती लोकांच्या मनाचा अचूक ठाव घेतला, की निव्वळ प्रश्‍नावली भरून घेतली, यावर मतचाचण्यांच्या निष्कर्षाची अचूकता अवलंबून असते. आताही चार राज्यं आणि  एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक जाहीर झाल्यानंतर हाती आलेला पहिला मतचाचणी अहवाल केरळमधील डावे वगळता अन्य कुणालाही निर्भेळ आनंद मिळू देणारे नाहीत.

निवडणूक आयोगानं चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांत पहिलीच मतचाचणी जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या अगोदर तीन आठवडे हे अंदाज जाहीर झाले असल्यानं मागं पडू शकत असलेल्या पक्षांना त्यात सुधारण्याची संधी असते, तर काहींना आणखी प्रयत्न करण्यास वाव असतो. अर्थात मतचाचणीत किती लोकांची मतं अजमावली, ती कधी घेण्यात आली, यावरही तिच्या निष्कर्षातील अचूकता असते. पश्‍चिम बंगाल, आसाम, तमीळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्या मतचाचणीचे अंदाज आले आहेत. त्यातही मतचाचण्यानंतर काही राजकीय घडामोडी घडू शकतात. त्यातून निवडणुकीचे अंदाज बदलू शकतात. असं असलं, तरी पहिल्या मतचाचण्यांचा निष्कर्ष पाहिला, तर पाचपैकी दोन ठिकाणी सत्तांतर घडू शकतं आणि तीन ठिकाणी ’जैसे थे’ परिस्थिती राहिली, तरी भाजप पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारू शकतो, हे जे लोकांना वाटत होतं, तेच अंदाज मतचाचण्यांतूनही ध्वनित झालं आहे. निवडणूक होत असलेल्या पाच ठिकाणांपैकी पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणतात, तसं भाजपला दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही, हे ही संभवत नाही. अर्थात भाजपचा दोनशे जागा जिंकण्याचा निर्धारही अवास्तव आहे, हे भाजप सोडून सर्वांना समजत होतं. शंभराच्या आसपास जागा जिंकून भाजप प्रभावी पक्ष म्हणून पुढं येईल. काँग्रेस, डावे आणि तृणमूल काँग्रेसच्या जागाही भाजप घेईल, असा एकंदरित या पाहणीचा अर्थ निघतो. पश्‍चिम बंगालमध्ये ’ममताराज’ कायम राहणार असल्याची शक्यता मतचाचणीतून वर्तवण्यात आली आहे. या अंदाजांनुसार निकाल लागल्यास पश्‍चिम बंगाल काबीज करण्यासाठी आपली ’पॉवर’ लावणार्‍या भाजपला खूप मोठा धक्का बसणार आहे. या मतचाचणीचे अंदाज ज्या दिवशी बाहेर आले, त्याच दिवशी आसाममधील भाजपचा मित्रपक्ष काँग्रेस पक्षासोबतच्या आघाडीत दाखल झाला आहे. त्यामुळं त्या राज्यात ही आघाडी काय करते, याकडं स्वाभावीक लक्ष असणार आहे; परंतु मतचाचणीनुसार तिथं भाजपची सत्ता कायम राहणार आहे. पुदुच्चेरीत कमळ फुलेल, तमीळनाडूत एम. के. स्टॅलिन यांची जादू दिसेल तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता राहील, असा या मतचाचण्यांचा निष्कर्ष आहे.

पश्‍चिम बंगाल जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचं अख्खं मंत्रिमंडळ निवडणुकीच्या रिंगणात उतरविलं आहे. झारखंडसह लगतच्या राज्यांतील नेते पश्‍चिम बंगालमध्ये ठाण मांडून आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या वर्षापासून तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातील घमासान सुरू झालं आहे. ममता बॅनर्जी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपनं आपली सारी ताकद पणाला लावली आहे. मोदी, शाह यांच्या बंगाल वार्‍या वाढल्या आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये भाजपनं मोठी फूट पाडली आहे. ममता यांच्या पक्षातील अनेक बडे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. असं असताना या प्रतिष्ठेच्या लढाईत केंद्रात सत्ता असलेला भाजप नव्हे, तर ममता बाजी मारतील, असा या पाहणीचा अंदाज आहे. ममता यांच्या पक्षाच्या जागा सुमारे साठनं कमी होणार असल्या आणि भाजप तीन जागांवरून शंभरपर्यंत मजल मारणार असला, तरी सत्ता ममतांच्याच हाती राहणार आहे. त्यामुळं पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेचं कमळ फुलायला अजून काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयाची हॅट्ट्रिक साधतील. विधानसभेच्या 294 जागांपैकी 148 ते 164 जागा ममता यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात जातील. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा जिंकणारा भाजप या वेळी मुसंडी मारून 92 ते 108 जागा जिंकेल, तर डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीला 31 ते 39 जागा मिळतील, असा अंदाज जनमत चाचणीत बांधण्यात आला आहे. तृणमूलला 43 टक्के, भाजपला 38 टक्के तर डावे-काँग्रेस आघाडीला 13 टक्के मते मिळतील, अशी शक्यता आहे.  लोकसभेच्या निवडणुकीसारखीच ही मतांची टक्केवारी आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक 56 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना पसंती दिली आहे, भाजपचे दिलीप घोष यांना 25 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे, तर मुकुल रॉय हे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य आहेत असं नऊ टक्के लोकांचं म्हणणं आहे. 126 सदस्यसंख्या असलेल्या आसाम विधानसभेत पुन्हा भाजपचाच डंका राहील असा अंदाज आहे. भाजपला इथं 68 ते 76 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस 43 ते 51 जागांपर्यंत मजल मारेल आणि अन्य पक्षांच्या खात्यात 5 ते 10 जागा जातील अशी शक्यता आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सर्वानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री आहेत. तमीळनाडूत सत्तांतर होईल व स्टॅलिन यांचं सरकार येईल, असा अंदाज आहे. सत्ताधारी अण्णा द्रमुक-भाजप आघाडीचा मोठा पराभव होईल. 234 पैकी 58 ते 66 जागांवर या आघाडीला समाधान मानावं लागेल, तर स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक-काँग्रेस आघाडीला 154 ते 162 जागांसह निर्विवाद कौल मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं चांगलाच जोर लावला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही केरळवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळं काँग्रेसनंही निवडणूक प्रतिष्ठेची केली. सध्या केरळमध्ये सीपीआई (एम)च्या नेतृत्वखाली लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच एलडीएफचे सरकार असून पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. 2016 च्या निवडणुकीत एलडीएफला 91 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला 47 जागा मिळाल्या होत्या.आताही लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला 83 ते 91 दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 47 ते 55 दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यावरून तिथं फार काही फरक पडण्याची शक्यता दिसत नाही. दक्षिणेकडील पुद्दुचेरी जिंकून भाजप तिथं सत्ता मिळवू शकतो.

तीस सदस्यसंख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजप प्रथमच बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. भाजपला 17 ते 21 जागा मिळतील, काँग्रेसला आठ ते 12 जागांवर समाधान मानावं लागेल तर अन्य पक्षांच्या खात्यात एक ते तीन जागा जातील असा अंदाज आहे. पुद्दुचेेरीत गेल्या आठवड्यात काँग्रेसचं नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात येऊन पायउतार झालं आहे. काँग्रेसच्या आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. फारच छोट्या असलेल्या या केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं सभा घेतली. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा एकही आमदार निवडून आला नव्हता, तर काँग्रेसचे 15  आमदार निवडून आले होते. आता तिथं स्थानिक पक्षांऐवजी दोन राष्ट्रीय पक्षात लढत होण्याचे संकेत आहेत. आसाममध्ये, विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी भाजपचा सहयोगी पक्ष काँग्रेसप्रणित आघाडीमध्ये सामील झाला आहे. आसाममध्ये पुढील महिन्यातील निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंटनं जाहीर केलं, की ते सत्ताधारी भाजपप्रणित युती सोडून विरोधी पक्षात प्रवेश करणार आहेत. बीपीएफचे अध्यक्ष हागरमा मोहिलारी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, की आसाममध्ये शांतता, ऐक्य आणि विकासासाठी काम करण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त स्थिर सरकार आणण्यासाठी बोडोलँड पीपल्स फ्रंटनं काँग्रेसप्रणीत आघाडीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बीपीएफ यापुढं भाजपशी मैत्री किंवा युती कायम ठेवणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत बीपीएफनं राज्यातील 126 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपप्रणित युतीमध्ये सामील झाले होते; परंतु गेल्या वर्षाच्या अखेरीस, भाजपनं बीपीएफला उडवून लावलं आणि बहुमत मिळवण्यासाठी आणि आसामच्या बोडो-बहुल भागात बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल (बीटीसी) ही स्वायत्त संस्था राखण्यासाठी नवीन साथीदार निवडलं होतं. राज्यात सरबानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये तीन मंत्री असलेले बीपीएफनं डिसेंबरमध्ये झालेल्या बीटीसी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि 40 पैकी 17 जागा जिंकल्या. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) चे 12 जागा जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं आणि आपल्या ट्विटमध्ये पक्षाला सहयोगी म्हणून संबोधलं. यूपीपीएलचे प्रमुख प्रमोद बोरो हे बीटीसीमध्ये नवे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) असतील अशी घोषणा सोनोवाल यांनी केली.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दोन ठिकाणी सत्तांतर, तीन ठिकाणी ’जैसे थे’!
दोन ठिकाणी सत्तांतर, तीन ठिकाणी ’जैसे थे’!
https://1.bp.blogspot.com/-ZzgKbFPK0sk/YDuM4KgC6JI/AAAAAAABopU/h373twYewFckxMqCM6vuhary0ezES-wBACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-ZzgKbFPK0sk/YDuM4KgC6JI/AAAAAAABopU/h373twYewFckxMqCM6vuhary0ezES-wBACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content