$type=ticker$snippet=hide$cate=0

टीएमसी म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन मोदी यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल

  कोलकात्ताः टीएमसीचा अर्थ ट्रान्सफर माय कमिशन असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्...

 




कोलकात्ताः टीएमसीचा अर्थ ट्रान्सफर माय कमिशन असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुरुलिया येथील रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी टीएमसी तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्यावर जोरदार हल्ला केला. टीएमसीने बंगालमध्ये माओवाद्यांची नवी जात निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. 

ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या वनवासाची साक्षीदार आहे. या भूमीवर सीताकुंड आहे. जेव्हा सीतामाता तहानेने व्याकुळ होती, तेव्हा प्रभू श्रीरामांनी जमिनीवर बाण मारून पाणी काढले होते अशी कथा आहे. आणि याच पुरुलियामध्ये पाण्याची समस्या असणे विडंबन आहे, असे मोदी या वेळी म्हणाले. ममतांचे सरकार पुरुलियाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, की आधी डावे आणि नंतर टीएमसी सरकारने पुरुलियामध्ये उद्योग येऊ दिले नाहीत. सिंचनासाठी ज्या पद्धतीचे काम व्हायला हवे होते, तसे काम झाले नाही. पाण्याची कमतरता असल्याने रोज ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्याची मला कल्पना आहे. टीएमसी सरकार आपल्या खेळात व्यस्त असून शेतीकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका मोदी यांनी केली. पश्‍चिम बंगालमधील जनता इतकी वर्षे चुकीच्या पद्धतीने सरकार चालवल्याची ममता बॅनर्जी यांना शिक्षा देईल. दीदी म्हणतात ‘खेला होबे’, पण भाजप म्हणते, ‘विकास होबे’, ‘शिक्षा होबे’. टीएमसीने नवे माओवादी निर्माण केले आहेत ज्याचे काम जनतेचा पैसा लुटणे इतकेच आहे असा आरोप या वेळी त्यांनी केला. बंगालने आपला निर्णय घेतला आहे, लोकसभेत टीएमसी हाफ आणि यावेळी पूर्ण साफ असे ते म्हणत आहे. हा निर्धार पाहता ममता बॅनर्जी माझ्यावर सगळा राग काढत आहेत; पण माझ्यासाठी देशातील करोडो मुलींप्रमाणे त्या आहेत. त्यांचा आदर करणे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणून त्यांच्या पायाला जखम झाली, तेव्हा आम्ही चिंता व्यक्त केली. त्यांनी लवकर बरे व्हावे, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे मोदी म्हणाले.



Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: टीएमसी म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन मोदी यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल
टीएमसी म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन मोदी यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/whatsapp-image-2021-03-19-at-9.11.38-am_202103582775.jpeg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_118.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_118.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content