$type=ticker$snippet=hide$cate=0

अहमदनगर : कोरोनाचा कहर...जिल्हा लॉकडाऊन उंबरठ्यावर

  अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे. रविवारी साडेसहाशे रुग्ण सापडल्यानंतर आता बाधितांचा रोज उच्चा...

 


अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे. रविवारी साडेसहाशे रुग्ण सापडल्यानंतर आता बाधितांचा रोज उच्चांक होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये म्हणजे रविवारी सायंकाळपासून सोमवारी सायंकाळपर्यंत 857 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नगर जिल्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन करण्याबाबत अद्याप तयारी दाखवली गेली नसली तरी रुग्ण संख्या जर अशीच रोज वाढत राहिली तर काही दिवसांसाठी लॉकडाऊन किंवा मग संचारबंदीची वेळ अधिक वाढण्याची शक्यता आहे. नगर शहरातील बाजारपेठेत वाढत असलेल्या गर्दीवर नियंत्रण आता गरजेचे झाले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये वाढलेल्या उच्चांकी आकड्यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे अहमदनगर शहरापाठोपाठ राहाता तालुक्यात आहेत. या दोन्ही ठिकाणी बाधितांची तीन अंकी रुग्णसंख्या आहे. अहमदनगर शहर 291, राहाता 111, संगमनेर 84, कोपरगाव 76, श्रीरामपूर 52, जामखेड 37, नगर तालुका 34, नेवासे 27, राहुरी 26, पारनेर 21, पाथर्डी 19, कर्जत 18, शेवगाव 15, भिंगार शहर 15, अकोले 14, श्रीगोंदे 6, इतर जिल्ह्यातील 11 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनुसार 319, खाजगी प्रयोगशाळेनुसार 475 आणि रॅपिड चाचणीनुसार 63 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. नगर शहरातील बाधितांचा आकडा सोमवारी सायंकाळी तीनशे जवळ पोहोचला आहे. नगर शहरात गेल्या 24 तासांमध्ये 291 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. वाढत्या बाधितांमुळे उपचारार्थींचा आकडा चार हजाराच्या उंबरठ्याजवळ पोहोचला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर मागील तीन दिवसांपासून जिल्हा दौर्‍यावर होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या दौर्‍यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. सोमवारी त्यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन सूचनाही दिल्या आहेत. कोरोना नियमांचे पालन करीत नसलेल्या दुकानांना महिनाभर बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान, नागरिकांकडून नियमांचे पालन होत आहे. मास्क वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. त्यामुळे लॉकडाऊनचा कोणताही निर्णय सध्या प्रशासनाचा नाही. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेवरून नागरिकांनीच आपण आपलीच जबाबदारी घ्यायची आहे, असे दिसते आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याची गरज असल्याने गर्दीत जाणे टाळले पाहिजे तसेच फारच गरज असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे. घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे सक्तीने केले पाहिजे. तसेच बाहेर कोठे गेल्यावर हात सॅनिटायझेशन करणे, कार्यालयात वा दुकानातून काही खरेदीसाठी गेल्यावर तेथे सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. असे असले तरी बाकीच्या गोष्टींचा विचार करता लॉकडाऊनचा निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही, त्यापेक्षा उपाययोजना आणखी कडक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


 


मनपात 50 टक्के उपस्थिती ठेवा

अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांची 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येऊन कामकाज चालविण्याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी मनपा कामगार युुनियनने केली आहे. अहमदनगर महापालिका कामगार युनियनने 22 रोजी आयुक्तांना निवेदन दिले असून, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी 24 पासूनचे बेमुदत धरणे आंदोलनाची नोटीस याद्वारे दिली आहे. यात म्हटले आहे की, महापालिका कामगार-कर्मचार्‍यांपैकी लिपिक-टंकलेखक, सहायक स्वच्छता निरीक्षक, मुकादम या पदांवर दोन वर्षापूर्वी पदोन्नती दिलेल्या कर्मचार्‍यांचे पदोन्नतीविषयक परिविक्षाधीन कालावधी संपुष्टात आला असल्याने या कर्मचार्‍यांना पदोन्नती कायम केलेबाबतचे अंतिम आदेश तात्काळ देण्यात यावे तसेच सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रकोप वाढत असून नव्याने दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या मुख्यालयातील सामान्य प्रशासन व निवडणूक विषयक कामकाज विभाग कार्यालय येथे 4 कर्मचारी तर महापालिकेचे 2 सहायक आयुक्त यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने शासनाने दिलेल्या आदेशानुसार मनपाच्या सर्व कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवली जावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10849,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17469,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14777,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अहमदनगर : कोरोनाचा कहर...जिल्हा लॉकडाऊन उंबरठ्यावर
अहमदनगर : कोरोनाचा कहर...जिल्हा लॉकडाऊन उंबरठ्यावर
https://1.bp.blogspot.com/-35D-ceaoESY/YFmSO_FjYHI/AAAAAAABpLc/KmIJy1LVI70QacrzjR9_MzC5WtEN_iWtACLcBGAsYHQ/s0/download%2B%25288%2529.jpg
https://1.bp.blogspot.com/-35D-ceaoESY/YFmSO_FjYHI/AAAAAAABpLc/KmIJy1LVI70QacrzjR9_MzC5WtEN_iWtACLcBGAsYHQ/s72-c/download%2B%25288%2529.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_121.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_121.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content