$type=ticker$snippet=hide$cate=0

बोठेकडील त्या बॅगची पोलिसांकडून चौकशी ; घराची पुन्हा झडती; आज पारनेर न्यायालयात नेणार

अहमदनगर/प्रतिनिधीम नगरमधून गायब होत असताना सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठेकडेे असलेल्या त्या बॅगचा छडा पोलिसांनी लावला आहे. त्याच्या घ...



अहमदनगर/प्रतिनिधीम नगरमधून गायब होत असताना सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठेकडेे असलेल्या त्या बॅगचा छडा पोलिसांनी लावला आहे. त्याच्या घराची पोलिसांनी पुन्हा झडती घेऊन काही वस्तू व साहित्य ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शनिवारी (20 मार्च) पारनेर न्यायालयात हजर केले जाणार आहे.


यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याची दोन दिवसापासून सखोल चौकशी सुरू झाली असताना शुक्रवारी त्याच्या घराची झाडाझडती घेऊन अनेक गोष्टी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. जरे हत्याकांडमध्ये दहा आरोपींचा समावेश आहे. बोठे हा तीन महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून तपासणी सुरू केली होती. सुरुवातीला तीन दिवस तो या घटनेबद्दल काहीच सांगायला तयार नव्हता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमोर हजर केल्यानंतर तीन दिवसानंतर तो बोलू लागला. या घटनेसंदर्भात काही माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
गुरुवारी पोलिसांनी नगर शहरामध्ये विविध ठिकाणी बोठेला नेऊन त्याची चौकशी केली. त्याच्याकडे हस्तगत झालेली बॅग ही नेमकी कुठून व कशी आली होती, याचा छडा या चौकशीमध्ये लावण्यात आला आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी त्याला नेले होते, त्या ठिकाणी त्याची माहिती घेतली व चौकशीमध्ये काही माहिती त्याने दिली , त्याची पडताळणी केली होती. शुक्रवारी बोठे याच्या घराची झाडाझडती त्याच्या समक्ष घेण्यात आली. घरामधील काही वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या असून त्या त्यांनी हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडून या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती पोलिस घेत आहेत.
बोठे याला अटक केल्यानंतर त्याला वीस तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत शनिवारी (20 मार्च) संपत आहे. पोलिस कोठडीमध्ये विविध माहिती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अन्य काही बाबींचेसुद्धा पोलिसांना त्याच्याकडून स्पष्टीकरण घ्यायचे आहेत. तसेच तपाससुद्धा अजून करायचा आहे. त्यामुळ शनिवारी पारनेर न्यायलयामध्ये पोलिस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी पोलिसांच्या वतीने केली जाण्याची शक्यता आहे. बोठे याच्याकडे असलेला आयफोन उघडत नसल्यामुळे दोन दिवसांपासून सायबर सेलने प्रयत्न केला; मात्र तो न उघडल्यामुळे आता येत्या दोन दिवसांमध्ये तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहे. फोनमधली अधिक माहिती कळल्यानंतर तपासाची सूत्रे त्या दिशेने फिरणार आहेत.
चौकट
हजारेंच्या कार्यालयाकडून इन्कार
ःःःःःःःःःः.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बोठे याने पत्र पाठवले असल्याची बाब प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर अण्णा हजारे यांच्या कार्यालयाकडून याचा इन्कार करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेकडे या बाबतची कोणतीच माहिती नाही. जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील आणि तपासी अधिकारी अजित पाटील यांच्याविषयी त्याने तक्रार केल्याची चर्चा होती. 

Name

] ब्रेकिंग,875,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5955,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,383,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,79,satara,281,satara.,7,solapur,1,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10821,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,743,देश,4589,नाशिक,827,पुणे,850,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17411,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,171,महाराष्ट्र,14719,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4133,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1630,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बोठेकडील त्या बॅगची पोलिसांकडून चौकशी ; घराची पुन्हा झडती; आज पारनेर न्यायालयात नेणार
बोठेकडील त्या बॅगची पोलिसांकडून चौकशी ; घराची पुन्हा झडती; आज पारनेर न्यायालयात नेणार
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/1103x827/bal-bothe1_202103579245.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_125.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_125.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content