पुणे : दिवसेंदिवस शहरात आणि ग्रामीण भागात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमधील बेड पूर्ण क्...
पुणे : दिवसेंदिवस शहरात आणि ग्रामीण भागात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमधील बेड पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. त्यामुळे बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना शोधाशोध करावी लागत आहे. मागील महिनाभरापासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, शहरातील नव्या करोनाबाधितांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
अत्यवस्थ रुग्णांची संख्याही पाचशेच्या वर गेली असून, साडेनऊशे रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. तुलनेने लक्षणेविरहीत किंवा सौम्य लक्षणे असल्याने घरी विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली, तरी शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील बेड भरत आहे. महापालिकेचे बाणेर येथील कोविड रुग्णालय, डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय, धायरीतील लायगुडे रुग्णालय, शिवाजीनगरचे दळवी रुग्णालय आणि बोपोडीतील खेडेकर रुग्णालयातील सर्व ऑक्सिजनयुक्त खाटा भरल्या आहेत.