$type=ticker$snippet=hide$cate=0

विखेंची खरी परीक्षा लोकसभेत

मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या ताकदीचा डॉ. सुजय विखे यांना किती गर्व झाला होता, हे सर्वज्ञात आहे. त्या वेळी नगर लोकसभा मतदारसंघात श्रीगो...



मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या ताकदीचा डॉ. सुजय विखे यांना किती गर्व झाला होता, हे सर्वज्ञात आहे. त्या वेळी नगर लोकसभा मतदारसंघात श्रीगोंदे आणि नगर वगळता सर्वंच ठिकाणी युतीचे आमदार होते. फसवणुकीचं राजकारण सतत यशस्वी होत नसतं, याचा अनुभव विखे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीतच आला. 

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे चित्र होतं, ते विधानसभेत राहणार नाही. सलग दुसर्‍यांदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लोकांनी मतदान केलं, हे जसं खरं तसंच या लोकसभा मतदारसंघातील मोनिका राजळे, प्रा. राम शिंदे, बबनराव पाचपुते, विजय औटी, अनिल राठोड, शिवाजीराव कर्डिले यांनी विखे यांच्या यशाला मोठा हातभार लावला. निवडणुकीची तयारी विखे यांनी एक वर्ष अगोदर केली होती. त्यासाठी गावोगाव आरोग्य शिबिरं भरविली गेली. लोकांवर उपचार करविले गेले. लोकांना वाटलं, की आपल्या आरोग्याची काळजी घेणारा हा तरुण, उमदा उमेदवार आहे. त्याच्या पदरात लोकांनी भरभरून मताचं दान टाकलं. त्यानंतर खासदार विखे यांनी आपण गटा-तटाचं राजकारण करणार नाही, असं सांगितलं. भाजपव्यरिक्त अन्य पक्षात असलेल्या आपल्या हितचिंतकांना व्यासपीठावर घेणार नाही, असंही जाहीर केलं. पुढं काय झालं, हे दिसलंच आहे. लोकसभेची निवडणूक होऊन आता 22 महिने झाले आहेत. या 22 महिन्यात पद्मश्री विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलला गावोगावी शिबिरं घ्यावी, असं का वाटलं नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घेतलेल्या शिबिरांमुळं संपूर्ण नगर लोकसभा मतदारसंघ व्याधीमुक्त झाला का, या प्रश्‍नाचं उत्तर विखे देणार नाहीत. निवडणुकीपुरतीचं ही शिबिरं होती, असा संदेश सामान्यांमध्ये गेला आहे. विखे यांची यंत्रणा नागरिकांची काळजी फक्त निवडणुकीपुरतीच घेते, याचा अनुभव नागरिकांना आला आहे. खरंतर ज्यांच्या मदतीमुळं आपण खासदार झालो, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहावं, तर तसंही नाही. आता मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी विखे यांनी तो कृतघ्नपणा केला, त्याची परतफेड करण्याची संधी पराभूत उमेदवारांना आली आहे. विखे महत्त्वाचे, की आपण आणि विखे यांची खरंच आपल्याला पराभूत करण्याइतकी ताकद आहे का, हे त्यांना दाखवून देण्याची संधी आता पराभूत नेते नक्कीच सोडणार नाहीत. 

शिवाजीराव कर्डिले फार पूर्वीपासून विखे गटाचे. विखे यांच्याविरोधात वडगाव गुप्ता परिसरात जेव्हा मोठं आंदोलनं उभं राहिलं आणि विखे हॉस्पिटलला जागा द्यायला लोकांनी विरोध केला, तेव्हा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या कर्डिले यांनी बाळासाहेब विखे यांचं ऐकून त्यांना मदत केली. कर्डिले यांचा मतदारसंघ विखे यांच्या मतदारसंघाच्या शेजारी असलेल्या राहुरी तालुक्यात आहे. तिथं विखे यांची मोठी नातीगोती आहेत. सुजय विखे यांचं नेतृत्व असलेल्या डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखान्याचं ते कार्यक्षेत्र. त्यामुळं कर्डिले यांनी त्यांना मनापासून साथ दिली. त्याच कर्डिले यांच्या पराभवाला विखे कारणीभूत ठरले. तिकडं नेवाशात विखे यांचा मतदारसंघ नसला, तरी बाळासाहेब मुरकुटे यांच्या पराभवाला ते कारणीभूत ठरले. शेवगाव-पाथर्डीन मतदारसंघात मोनिका राजळे यांच्या विरोधातही विखे गटानं विरोधात काम केलं; परंतु तिथं जातीय समीकरणं आणि पंकजा मुंडे यांची साथ राजळे यांच्या उपयोगी पडली. कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रा. शिंदे यांच्या पराभवालाही विखेच जबाबदार आहेत. ज्या औटी यांनी विखे यांना लोकसभेला मदत केली, त्या विजय औटी यांच्या विरोधात युतीचा धर्म विसरून विखे सेना राष्ट्रवादीच्या मदतीला गेली. नगरमध्ये तर अनिल राठोड यांच्या एका प्रचारसभेत अनिलभैय्यांची ही शेवटची निवडणूक असं सांगण्याचा आगाऊपणा सुजय यांनी केला होता. इतर पक्षांतील कुणाला किती काळ उमेदवारी द्यायचा, हे सांगण्याचा अधिकार त्यांना कुणी दिली. तिकडं कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून तर सुजय यांचे मामा राजेश परजणे हे दंड थोपटून उभे होते. त्यांना मतं किती मिळाली, हा वादाचा मुद्दा असला, तरी त्यांच्यामुळं स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला, हे विसरता येणार नाही. भाजपच्या या पराभूत उमेदवारांनी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार केली. तक्रारदारांचे नेते होते प्रा. शिंदे. नाशिक, मुंबई इथं तक्रारी करण्यात आल्या. स्नेहलता कोल्हे यांच्या निवडणूक यंत्रणेनं तर मतदानाच्या दिवशीच विखे यांच्याविरोधात तक्रार करून त्यांची यंत्रणा कसं आपल्याविरोधात काम करीत आहे, हे स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे विखे यांना भाजपत प्रवेश देण्याच्या अगोदर ते भाजपला उपयुक्त ठरणार नाहीत, तर ते त्रासदायक ठरतील, असं कोल्हे यांच्यासह काही नेत्यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणलं होतं; परंतु त्या वेळी विरोधकांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी विरोधी पक्षनेताच पळवून नेल्यामुळं जणू आपल्या हाती स्वर्ग आल्याचा आनंद भाजपला झाला; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच हा आनंद किती क्षणभंगूर होता आणि विखे यांच्यामुळं फायदा होत नाही, तर तोटा होतो, हे स्पष्ट झालं. या नेत्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीच्या नेत्यावरच नंतर कारवाई झाली. विखे यांच्याविरोधातील तक्रारीला त्यामुळं काहीच अर्थ राहिला नाही. विखे म्हणतील, ती पूर्वदिशा असं ते ज्या पक्षात जातात, तिथं होते आणि नेते मात्र आपल्याच पक्षापासून दूर जातात आणि पक्ष विखेंभोवती केंद्रीत होतो, याचा अनुभव भाजपला आता येतो आहे.



 







Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1635,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विखेंची खरी परीक्षा लोकसभेत
विखेंची खरी परीक्षा लोकसभेत
https://1.bp.blogspot.com/-CDEwbdiIhbM/YFICQ_sENbI/AAAAAAABpCM/Zsg1lDJ8EL0HAAvEaG-dhHDuXHbeG-JnACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-CDEwbdiIhbM/YFICQ_sENbI/AAAAAAABpCM/Zsg1lDJ8EL0HAAvEaG-dhHDuXHbeG-JnACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_145.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_145.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content