इस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या पैशातून उभारलेले कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व अनेक सहकारी संस्था स्वतःच्या मालकीच्या करणार्या पित...
इस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या पैशातून उभारलेले कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व अनेक सहकारी संस्था स्वतःच्या मालकीच्या करणार्या पिता-पुत्रांना सभासद या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील, अशी टीका कृष्णा कारखाना माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली. मसूचीवाडी (ता. वाळवा) येथे झालेल्या कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते.
मोहिते म्हणाले, कृष्णा कारखान्याचे खाजगीकरण करण्याचा भोसले पिता पत्रांचा हा डाव मोडून काढायला हवा. कृष्णा कारखान्याचे ऊस तोडणी यंत्रणा जयवंत शुगरला का वापरली जाते? अतुल भोसले हे कारखान्याचे संचालक नाहीत तर मग 30 लाख रुपये खर्चून त्यांची कारखाना कार्यस्थळावर केबिन का केली जाते? आम्ही जर 58 कोटी चा इतका मोठा अपहार केला असता तर आमचा नवीन साखर कारखाना उभारला असता. या निवडणूक रिंगणात आम्ही उतरलो नसतो. नाहीतर विजय मल्ल्या, निरव मोदी सारखे देशाबाहेर जाऊन मजा मारल्या असत्या. शेतकर्यांसाठी आम्ही कृषी प्रदर्शन आयोजित करत होतो तर यांनी फक्त आमचे वडिलांची नाव दिले म्हणून ते बंद ठेवले. आमच्या काळात डिस्टीलरीचा नफा 25 कोटी होता. यांच्या सत्ताकाळात 5 कोटीच्या वर दिसत नाही. विरोध करणारे 6 हजार सभासद अपात्र ठरवले. यांनी मात्र एकही गुंठा जमीन नावावर नसलेल्या लोकांना सत्तेसाठी सभासद करून गरीब, शेतकरी सभासदांचे शोषण करण्याचे काम चालवले आहे.
यावेळी माजी संचालक उदयसिंह शिंदे, विक्रमसिंह पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.