कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील पढेगाव येथील ग्रामपंचायत १४वा वित्त आयोगातून गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गटाचे जि.प.सदस्य राजेश परजणे यांच्य...
कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील पढेगाव येथील ग्रामपंचायत १४वा वित्त आयोगातून गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गटाचे जि.प.सदस्य राजेश परजणे यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाची पंचायत समिती प्रशासनाला अधिकृत माहितीच नसल्याचा खुलासा गटविकासअधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी केला असुन या कार्यक्रमाबाबत पंचायत समिती प्रशासन अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे.
रस्ता उद्घाटन आटोपल्यानंतर परजणेंनी ग्रामस्थांसमोर प्रथम ग्रामसेवकास फोन लावला नंतर गटविकास अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर कल्पना देऊन सायंकाळपर्यंत कारवाईची अपेक्षा व्यक्त केली तरी पदाधिकारी गावात येत असल्यास कर्मचाऱ्याने उपस्थित रहावे हा प्रोटोकॉल असला तरी कर्मचारी हजरच असावा असा काही शासकीय नियम नाही.मात्र तसा जिल्हा परिषद ठराव असल्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने फोनवर संदेश पाठवुन ग्रामसेवकांकडून लेखी खुलासा घेऊन जि.प.सदस्याची मनधरणी केली असली तरी कर्मचाऱ्यांने कळवलेला खुलासा योग्य न वाटल्यास जिल्हा परिषदेने केलेल्या ठरावानुसार समज देणे,कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करणे,थेट सेवापुस्तिकेत तक्रारीची नोंद करणे अशा स्वरुपाच्या कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे मत गटविकास अधिकाऱ्यांनी मांडले. कार्यक्रमाबाबत पंचायत समिती प्रशासन जर अनभिज्ञ होतेच तर ग्रामसेवकाकडून लेखी खुलासा कसा मागितला जातो.हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.सहा महिन्यात पढेगाव ग्रामपंचायतच्या दोन वेळा पंचायत समिती स्तरावर तक्रारी देखील झालेल्या आहे.आता रस्ता उद्घाटन नवीनच वाद समोर घेऊन आले आहे.मात्र ठेकेदाराने कामाची यंत्रणा हलवली असली तरी आता ठेकेदारास कामाचा दर्जा सांभाळावा लागणार आहे.नाहीतर पुन्हा आगित तेल ओतले जाण्याची भिती सुज्ञ नागरीक व्यक्त करत आहे.
चौकट
विद्यमान जि.प.सदस्य यांचा निधितील एक रुपया गावाला मिळालेला नाही.ज्यांच्या हस्ते उद्घाटन केले ते या गटाचे प्रतिनिधित्व करत नाही.आजपर्यंत गावात झालेली लाखो रुपयांची विकासकामे ग्रामपंचायतने यापुर्वी तालुका पातळीवरील नेत्यांच्या हस्ते उद्घाटन न करता मर्जीतील ठेकेदारांकडुन करुन घेतलेली आहे.