अहमदाबाद : भारतीय कर्णधार विराट कोहलीला त्याचा आक्रमकपणा नडण्याची चिन्हे आहेत. इंग्लंडविरोधात शनिवारी झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात इंग्...
अहमदाबाद : भारतीय कर्णधार विराट कोहलीला त्याचा आक्रमकपणा नडण्याची चिन्हे आहेत. इंग्लंडविरोधात शनिवारी झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाल्यानंतर विराट कोहलीची आक्रमक प्रतिक्रिया त्याला अडचणीत आणू शकते. त्याच्यावर निलंबनाची कारावाई होऊ शकते.
दरम्यान, निलंबनाच्या कारवाईबाबत माहिती मिळालेली नाही. निलंबनाची कारवाई लगेच किंवा विलंबनाही होऊ शकते. कोहलीवर आयसीसी संहिता 2.5 नुसार आरोप निश्चित होऊ शकतात. त्यात अभद्र भाषेचा वापर, फलंदाज बाद झाल्यानंतर इशारे किंवा आपल्या कृत्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजाला चिथवणे आदींचा समावेश आहे.