$type=ticker$snippet=hide$cate=0

मनपा सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी भाजप ; शिवसेना पडली संभ्रमात, पुन्हा धोबीपछाडची चिन्हे

अहमदनगर-महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत कोणताही नवा ट्वीस्ट येण्याची चिन्हे धुसर दिसू लागली आहेत. मनपातील सध्याच्या भाजप-...

अहमदनगर-महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत कोणताही नवा ट्वीस्ट येण्याची चिन्हे धुसर दिसू लागली आहेत. मनपातील सध्याच्या भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीत कोणतेही विघ्न येणार नसल्याचे संकेत मंगळवारच्या घटनेने दिले आहेत. राष्ट्रवादीचे सभापतीपदाचे उमेदवार अविनाश घुले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हजर असल्याने मनपातील भाजप-राष्ट्रवादी मैत्रीने शहर शिवसेनेला पुन्हा धोबीपछाड देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक लढवायची की नाही, या संभ्रमात शिवसेना आहे.  


पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीबाबत काही घडवता येते काय याची चाचपणी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने सभापतीपदाचा उमेदवार म्हणून विजय पठारे यांचे नाव निश्‍चित केले असले तरी ते उमेदवारी दाखल करणार की नाही, याचा निर्णय बुधवारी होणार आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या 4 मार्चला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी नगर सचिव कार्यालयात सुरू झाली. 4 मार्चला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीत सभापतीपदाची निवड होणार आहे. यासाठीची अर्ज दाखल करण्याचे काम मंगळवारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून नगरसेवक अविनाश घुले यांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर बाबासाहेब वाकळे तसेच विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर, सभागृह नेते व भाजपचे नगरसेवक मनोज दुलम, राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, सागर बोरुडे व प्रकाश भागानगरे, बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक मुदस्सर शेख यांच्यासह धनंजय जाधव, संजय चोपडा, सचिन जाधव, निखील वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.


त्या मैत्रीचे पुन्हा दर्शन

महापालिकेत भाजपचा महापौर राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने झाला आहे. मनपाच्या राजकारणातील सुमारे सव्वा दोन वर्षांपासूनची ही मैत्री आजही कायम आहे व तिचे दर्शन स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरतानाही झाले. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे आवर्जून यावेळी उपस्थित असल्याने स्थायी समितीत असलेल्या भाजपच्या चार सदस्यांचा पाठिंबा राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले यांना राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच घुले यांनी उमेदवारी दाखल करताना दोन अर्ज दाखल केले असून, त्यापैकी एका अर्जावर सूचक म्हणून बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख व अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे यांचे नाव आहे. तर दुसर्‍या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे सागर बोरुडे व अनुमोदक म्हणून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव यांचे नाव आहे. त्यामुळे स्थायी समितीतील 16 सदस्यांपैकी राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांसह भाजपचे 4 आणि बहुजन समाज पक्ष व काँग्रेस यांचे प्रत्येकी 1 अशा तब्बल 11 सदस्यांचा पाठिंबा घुले यांना स्पष्ट झाला असून, सभापतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय मंगळवारीच निश्‍चित झाला, त्यावर 4 मार्चच्या सभेत औपचारिक निवडीचे शिक्कामोर्तब बाकी असल्याचे दिसू लागले आहे.


त्यावेळचे दर्शन अनोखे

मंगळवारच्या घटनेने मनपातील राष्ट्रवादी-भाजपच्या मैत्रीचे स्पष्टीकरण झाले असले तरी चार महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत हे दर्शन अनोख्या पद्धतीने झाले होते. स्थायी समितीवर भाजपच्या कोट्यातून सदस्य झालेले मनोज कोतकर यांनी चक्क राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांच्याकडून निवडणूक लढवली व त्यावेळी ते राष्ट्रवादीचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार असल्याचे सांगून निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला माघार घ्यायला लावली गेली होती व ते बिनविरोध निवडले गेले होते. त्यावेळी कोतकर हे भाजपचे की राष्ट्रवादीचे यावर जोरदार गदारोळ झाला होता. पण त्यांनीही ते नेमके कोणाचे हे स्पष्ट केले नाही व तो मुद्दा अखेरपर्यंत अनुत्तरीतच राहिला. या पार्श्‍वभूमीवर यावेळी तर आता भाजपने स्पष्ट पाठिंबा व तोही स्वतःहून दिल्याने राष्ट्रवादी-भाजप मैत्री कायम असल्याचे दिसू लागले आहे.


शिवसेना संभ्रमात

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेना संभ्रमात पडली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मैत्री धर्मानुसार मागील सभापतीपद राष्ट्रवादीचे समजून बिनविरोध दिले असताना यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेला सभापतीपद अपेक्षित होते. पण तसे न होता राष्ट्रवादीने भाजपचा पाठिंबा घेतल्याने शिवसेना संभ्रमात पडली आहे व सभापतीपदाची निवडणूक लढवायची की नाही, यावर विचारमंथन त्यांचे सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याने त्यातून येणार्‍या निष्कर्षानुसार शिवसेना उमेदवारी दाखल करायची की नाही, याचा निर्णय घेणार असल्याचे सेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, सेनेने मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत या निवडणुकीसाठी केडगावचे नगरसेवक विजय पठारे यांचे नाव निश्‍चित केले आहे. मात्र, ते उमेदवारी दाखल करतात की नाही, हे बुधवारी दुपारी 3नंतरच स्पष्ट होणार आहे.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मनपा सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी भाजप ; शिवसेना पडली संभ्रमात, पुन्हा धोबीपछाडची चिन्हे
मनपा सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी भाजप ; शिवसेना पडली संभ्रमात, पुन्हा धोबीपछाडची चिन्हे
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/ahmednagar-corporation_20171242108.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_18.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_18.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content