$type=ticker$snippet=hide$cate=0

बौद्धभूमीची युद्धभूमी

गेल्या महिन्यापासून म्यानमारमध्ये लष्कराविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जनता मागे हटा...

गेल्या महिन्यापासून म्यानमारमध्ये लष्कराविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जनता मागे हटायला तयार नाही. पोलिसांच्या गोळीबारात सुरुवातीला एक नंतर दोन जण ठार झाले. आंदोलकांना गोळीबार करून पांगवता येते असे वाटत असले, तरी पोलिसांचा तो भ्रम ठरला. लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जनतेचा संघर्ष सुरू आहे. 


लष्कराने लोकनियुक्त सरकारला सत्तारूढ होऊ दिले नाही. लोकशाहीच्या गळ्याला नख लावले. लोकनियुक्त सरकारच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. त्याला आता महिना होत आला, तरी त्यातून अजून मार्ग निघालेला नाही. जगाने लष्करशाहीचा निषेध केला. न्यूझीलंडसारख्या देशांनी म्यानमारशी असलेले संबंध तोडले. काही देशांनी राजदूतांना परत बोलविले. आता रस्त्यावरचा संघर्ष आणखी वाढला आहे आणि पोलिस या आंदोलनाला दपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्यानमारमधल्या लष्करी उठावाचा विरोध करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांविरोधातली कारवाई पोलिसांनी अधिक तीव्र केली आहे. पोलिसांच्या कारवाईत कमीत कमी 18 जणांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने हा म्यानमारमधल्या लष्करी उठावाविरोधातल्या निदर्शनांमधला सर्वांत घातक दिवस असल्याचे म्हटले आहे. पूर्वीही आँग स्यू की यांनी लष्कराच्या विरोधात दीर्घकाळ संघर्ष केला होता. म्यानमारमध्ये पाच दशकांहून अधिक काळ लष्कराची सत्ता आहे. लष्कराने रक्तविहीन क्रांती कायम दडपली आहे. रंगून, मंडाले आणि दावेई या मोठ्या शहरांमध्येही पोलिसांनी कारवाई करताना जिवंत काडतूसे आणि अश्रूधुराचा वापर केल्याने अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला. म्यानमारमध्ये लष्कराने एक फेब्रुवारी 2021 रोजी बंड करत लोकनियुक्त आँग सान सू की सरकार बरखास्त केले. तेव्हापासूनच म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शने सुरू आहेत. रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे ’सोशल मीडिया’वर जे व्हीडियो शेअर झाले, त्यात पोलिसांनी गोळीबार करताच आंदोलक पळत असल्याचे दिसते. रस्त्यांवर पोलिसांनी तात्पुरते उभारलेले अडथळेही दिसत आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत काही लोकांना उचलून घेऊन जात असल्याचे दिसते. लोकशाहीसाठी सुरू असलेली शांततापूर्ण निदर्शने संपण्याची चिन्हे नसल्याने पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. म्यानमारमधल्या लष्करी शासकांनी संयुक्त राष्ट्रांसाठीच्या आपल्या राजदूतांवर कारवाई केली. लष्कराला सत्तेतून बाहेर काढायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. लष्कराविरोधात बोलल्यामुळे संयुक्त राष्ट्रांसाठीच्या आपले राजदूत क्यॉ मो तून यांची हकालपट्टी केल्याचे स्वतः लष्कराकडून सांगण्यात आले. या कारवाईच्या आदल्या दिवशीच तून यांनी म्यानमारमधून लष्करी शासनाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मदत मागितली होती. या वेळी बोलताना जोवर लष्कर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला सत्ता सोपवत नाही, तोवर कुणीही लष्कराला सहकार्य करायला नको, असे तून यांनी म्हटले होते. लष्करी शासन बरखास्त करून निष्पाप लोकांचे दमन थांबवावे आणि म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने तात्काळ पावले उचलायला हवीत. आपण म्यानमारमधल्या लष्करी शासनाला मान्यता देत नाही. त्यामुळे क्यॉ मो तून यापुढेही संयुक्त राष्ट्रांसाठी म्यानमारचे राजदूत असतील, असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर आता कठोर कारवाई सुरू आहे. रंगून, मंडाले आणि दावेई शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू आहेत. पोलिसी बळाचा वापर करूनही आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे आंदोलकांवर रबर बुलेट, अश्रूधुराचा वापर केल्यानंतर पोलिसांनी जिवंत काडतूसेही झाडली. अनेकांना या गोळीबाराचा सामना करावा लागला. अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. आतापर्यंत किती आंदोलकांना अटक झाली, याची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध झाालेली नाही. ’द असिस्टंट असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स’ या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 850 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे; मात्र गेल्या दोन दिवसात म्हणजे शनिवार आणि रविवारी आणखी शेकडो आंदोलकांना अटक झाली असावी, असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. सुरक्षा दलांच्या कठोर भूमिकेनंतरही म्यानमारमधल्या अनेक शहरात निदर्शने सुरूच आहेत. या आंदोलनांमध्ये जवळपास सर्वच समाज, वर्ग आणि वयाचे लोक उत्स्फूर्त भाग घेत आहेत. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू ची यांची सुटका करावी, अशी त्यांची मागणी आहे. म्यानमारमधील सर्वांत मोठं शहर असलेल्या रंगूनमध्ये पोलिसांनी अश्रूधूर सोडला, स्टेन गनचा आणि रबर बुलेटचाही मारा केला. निदर्शनांच्या ठिकाणी गोळीबारीचा आवाज ऐकू आला आणि ग्रेनेडचा धूरही दिसला. स्टेन गन आणि अश्रूधुराने आंदोलन पांगले नाही, तेव्हा पोलिसांनी यांगून शहरात वेगवेगळ्या भागात गोळीबार केला. दावेई शहरात चार लोकांचा गोळी लागून मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. इथेही पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. मंडाले शहरात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला आणि हवेत गोळीबारही केला. यात एकाचा मृत्यू झाला. एक राजकीय नेते क्यॉव मेन तिन यांनी, ’पोलिसांनी दावेई गावातही गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले,’ अशी माहिती दिली. शिक्षकांच्या एका आंदोलनात शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी स्टेन गनचा वापर केला. यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. बहुसंख्याक बौद्ध असलेल्या म्यानमारमधले पहिले कॅथोलिक कार्डिनल चार्ल्स मॉन्ग बो यांनी म्यानमारचे रुपांतर एखाद्या युद्धभूमीत झाल्याचे आपल्या ट्वीटर अकाउंटवरून म्हटले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोंमध्ये पोलिस आंदोलकांना हाकलत असल्याचे आणि अनेकजण रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. लष्कराने आंदोलकांना कितीही दडपण्याचा प्रयत्न केला, तरीहीस आंदोलकांचा निर्धार कायम आहे. आम्हाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पुन्हा नव्याने उभे राहू. त्यांनी हल्ला केला, तर आम्ही तो परतवून लावू. लष्करासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, अशा निर्धाराने लोकशाहीप्रेमी जनता उभी आहे. एक आंदोलक महिलेचा याबाबतचा निर्धार जगाने कौतुक करावा असा आहे. त्यांनी आमच्यावर काल आणि याआधीही गोळीबार केला आहे; मात्र मी याला घाबरत नाही. निदर्शनांसाठी घरातून बाहेर पडतानाच मी त्यांचा शेवटचा निरोप घेतला आहे. कारण कदाचित मी जिवंत घरी परतणार नाही. लष्कराचा आधीच पराभव झालेला आहे. आम्ही लष्कराला सांगू इच्छितो, की आम्ही घाबरत नाही आणि मागेही हटणार नाही, हे त्या महिलेचे उद्गार वाचले, की लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा निर्णय लष्कराला आज ना  उद्या घ्यावाच लागेल, असे दिसते. लष्करी उठावानंतर राजधानीत लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तेव्हापासून त्या कुठे आहेत, याचा पत्ता नाही. लष्करी उठावानंतर त्या कुठेच दिसलेल्या नाहीत. सू की यांच्या समर्थकांकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्यांची सुटका करण्याची मागणी होत आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आँग सान सू की यांच्या ’नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी पार्टी’ या पक्षाने घवघवीत यश मिळवलं होते. हा निकाल लष्करानेही मान्य करावा आणि सू की यांची सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. सू की यांच्याशी एका महिन्यानंतरही संपर्क होत नाही.

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बौद्धभूमीची युद्धभूमी
बौद्धभूमीची युद्धभूमी
https://1.bp.blogspot.com/--P6O10ON5BE/YDzooWJk5yI/AAAAAAABorA/GGwgsBEx1CYjgz4bU1uXMwcwmpAV5dwxgCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/--P6O10ON5BE/YDzooWJk5yI/AAAAAAABorA/GGwgsBEx1CYjgz4bU1uXMwcwmpAV5dwxgCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_2.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_2.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content