$type=ticker$snippet=hide$cate=0

फरार बोठेच्या शोधासाठी आणखी दोन पथके कार्यरत ; आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या शोधासाठी पोलिसांनी आणखी दोन ...

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या शोधासाठी पोलिसांनी आणखी दोन पथके कार्यरत केली आहेत. दरम्यान, फरार बोठेच्या शोधासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, कोणताही राजकीय वा अन्य दबाव आमच्यावर नाही, याचा पुनरुच्चार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. 


जरे यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर तीन दिवसातच पकडलेल्या पाच आरोपींकडे पोलिसांनी तपास केला होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार बाळ ज. बोठे हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या शोधासाठी त्यावेळी पोलिसांनी 5 पथके नियुक्त केली होती. पण तो सापडत नसल्याने पारनेर न्यायालयात स्टँडींग वारंटसाठी अर्ज केल्यावर व तो मंजूर झाल्यावर राज्यातील अकराशेवर पोलिस ठाण्यांना बोठेची माहिती पाठवून त्याचा शोध घेण्याचे सांगितले होते. पण त्यासही अपयश आले. त्या काळात स्थानिक स्तरावरील तपास पथके दोनवर आली होती. पण आता पुन्हा ती आणखी दोनने वाढवण्यात आली असून, बोठेचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. मृत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने फरार बोठेचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ येत्या 5 मार्चला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आता आणखी दोन पथके कार्यरत करून बोठेचा शोध सुरू केला आहे.

त्यांनी व्यक्त केली आशा

बोठेच्या शोधाबाबत पत्रकारांशी बोलताना पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, या हत्याकांडाचा तपास पोलिस अतिशय योग्य पद्धतीने व प्रामाणिकपणे करीत आहेत. तपास योग्य पद्धतीने होत असल्याने आरोपीसुद्धा लवकरच सापडेल, अशी आशा व्यक्त करून ते म्हणाले, याआधी आम्ही पथके वाढवली आहेत तसेच काहीजणांकडे विचारपूसही सुरू केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने उपोषणास बसण्याचा इशारा दिला असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांना उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही व आम्ही योग्य पद्धतीनेच तपास करीत आहोत, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

त्या गाडीत बदल करू नये

अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची हत्या ज्या गाडीत झाली, ती सँट्रो कार पुन्हा ताब्यात मिळण्यासाठी जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायालयाने निर्णय देताना ती कार रुणाल जरेच्या ताब्यात देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्या कारमध्ये कोणताही नवा बदल केला जाऊ नये वा या कारला कोणताही नवा रंग दिला जाऊ नये, असे न्यायालयाने बजावले आहे. कारला नवा कलर करणे वा कारमध्ये कुठल्याही प्रकारे नवे बदल करण्यास मनाई करताना न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यकता भासल्यास ती कार पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यासही स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान, रेखा जरे यांच्या हत्याकांडाला तीन महिने पूर्ण झाल्यावर पकडलेल्या 5 आरोपींविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच अद्याप सापडला नसलेला आरोपी बाळ बोठे याला फरार घोषीत करण्यासाठी तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: फरार बोठेच्या शोधासाठी आणखी दोन पथके कार्यरत ; आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा
फरार बोठेच्या शोधासाठी आणखी दोन पथके कार्यरत ; आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/1103x827/bal-bothe1565_202012536261.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_23.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_23.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content