$type=ticker$snippet=hide$cate=0

वरुण देसाई आहेत, तरी कोण़ ?

मुंबई/प्रतिनिधीः आयपीएलचा सट्टा खेळणार्‍यांकडून दीडशे कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केला. त्यांचा आणि व...


मुंबई/प्रतिनिधीः आयपीएलचा सट्टा खेळणार्‍यांकडून दीडशे कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केला. त्यांचा आणि वरुण सरदेसाई यांच्यात काय संवाद झाला, हे जाहीर करण्याची मागणी आ. नीतेश राणे आणि केशव उपाध्ये यांनी केली असली, तरी वरुण यांच्यावर यापूर्वीही खंडणी वसुलीचे आरोप झाले आहेत. त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळेही ते वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. शिवसेना, ठाकरे आणि सरकारलाही अडचणीत आणणारे वरुण सरदेसाई नेमके आहेत तरी कोण, हे जाणून घेतले पाहिजे. 


गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे कुटुंबातील एक सदस्य प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची जेव्हा चर्चा होत होती, तेव्हाच ठाकरे यांच्या निकटवर्तीयातील आणखी एक जण ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा त्या वेळी होती. हे निकटवर्तीय नाव म्हणजेच वरुण सरदेसाई. त्यांचा आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा काहीही संबंध नाही. वरुण सरदेसाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या बहिणाचा मुलगा. थोडक्यात आदित्य ठाकरे यांचे ते मावसभाऊ. आदित्य मंत्रिमंडळात गेल्यानंतर वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आली. तसेच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी त्यांनी संपादन केली आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय साधनांची व अन्य साधनसामुग्रीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. त्यात मृतदेह गुंडाळण्याच्या बॉडी बॅग, पीपीई किट व मुखपट्टी अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.  या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी अलीकडे एका पत्रकार परिषदेत केला होता. ’कोरोनाच्या काळात होत असलेल्या खरेदीची कुठलीही निविदा निघालेली नाही. या कंत्राटदारांचे राजकीय लागेबांधे असून त्यामागे पेंग्विन गँग कार्यरत आहे, असे देशपांडे म्हणाले होते. त्या वेळी देशपांडे यांनी वरुण यांचा नामोल्लेख केला होता. त्यानंतर सरदेसाई यांनी देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. सरदेसाई यांच्या या नोटिशीच्या अनुषंगाने अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून वरुण यांच्यावर हल्लाबोल केला होता. ’महापालिकेचा ’वरुण’ गोंधळ आतून तमाशा सुरू आहे,’ असा टोला खोपकर यांनी ट्विटच्या सुरुवातीलाच हाणला होता. ’मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणार्‍यांचा पर्दाफाश आम्ही करणारच! पेंग्विनच्या अंड्यातून आता कुठे बाहेर आलेला हा वरुण सरदेसाई आहे कोण? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?,’ असा सवाल खोपकर यांनी केला होता. देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 24 तासांत स्पष्टीकरण द्या. आहे हिंमत उत्तर द्यायची,’ असं आव्हानंच खोपकर यांनी दिलं होतं.

संदीप देशपांडे यांच्याप्रमाणेच भाजपचे आमदार मिहिर कोटेचा व नीतेश राणे यांनीही मुंबई महापालिकेत कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. कोटेचा यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेऊन गोरेगावातील नेस्को कोविड सेंटरसाठी भाड्याने घेण्यात आलेल्या विविध वस्तूंची किंमतीसह यादी दिली होती. तर, राणे यांनीही महापालिकेच्या कामाचे सर्व निर्णय कुठे आणि कधी होतात? हे निर्णय कोणाच्या सल्ल्याने होतात, याची माहिती विधिमंडळाता उघड करण्याचा इशारा दिला होता.  शिवसेनेत आता नवे कलेक्टर ऑफिसर आले आहेत. त्यांच्या कुंडल्या आम्हाला माहिती आहेत. ते कुठे जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कुणाशी तडजोड करतात, ते सर्व आम्हाला माहिती आहे,  असे नारायण राणेही म्हणाले होते. सरदेसाई यांना राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवर देखील टीका केली. कोणी तरी सरदेसाई सारखा येतो आणि वाय प्लस दर्जा मिळवतो, असे म्हणत हे सरदेसाई कोण आहेत? सरकार यांना का पाठिंबा देते? हे का अधिकार्‍यांना फोन करतात? तसेच हे का मंत्रालयात फिरतात, असा सवाल नीतेश यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख आहे की हे राज्य आर्थिक संकटात आहे. सरकारमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे आर्थिक संकट आले आहे का? याचा विचार व्हायला हवा. तसेच या सरकारमधील भ्रष्टाचार फक्त अधिकार्‍यांपुरता आहे का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. हे सर्व संदर्भ पाहिले, की मग वरुण यांना इतके महत्त्व का आले, याचे उत्तर मिळते.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वरुण देसाई आहेत, तरी कोण़ ?
वरुण देसाई आहेत, तरी कोण़ ?
https://static.toiimg.com/thumb/msid-80229243,width-1200,height-900,resizemode-4/.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_235.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_235.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content