सातारा / प्रतिनिधी : सध्या सातारा शहरातमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत चालला असून आज सातारा सैनिक स्कूलमधील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग ...
सातारा / प्रतिनिधी : सध्या सातारा शहरातमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत चालला असून आज सातारा सैनिक स्कूलमधील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सहा विद्यार्थ्यांना सैनिक स्कूलमध्येच विलगीकरण कक्षात ठेऊन उपचार सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांची प्रकती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे पथक त्याठिकाणी रवाना झाले आहे. आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी सैनिक स्कूलला भेट देऊन याची माहिती घेतली.
सैनिक स्कूलच्या पाहणीदरम्यान, स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमोडे यांनी याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. तसेच निकट सहवासितांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे.
सातारा सैनिक स्कूलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांवर सैनिक स्कूलमध्येच उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयात सैनिक स्कूलचे तीन विद्यार्थी चाचणी करण्यासाठी आले होते. त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये आणखी तीन असे सहा विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.