कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शुक्रवार दि १९ मार्च रोजी भागचंदभाऊ ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शुक्रवार दि १९ मार्च रोजी भागचंदभाऊ ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली. या वेळी श्री.गो.विदयालयात भागचंदभाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे .सहसचिव सचिन अजमेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे आदी मान्यवर उपस्थित होते. विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
कोपरगावचे थोर सुपुत्र, उद्योगपती, जेष्ठ नागरीक संघाचे नेते,दानशुर,सर्व धर्मात,सर्व जातीजमातीतील,व्यापारी मंडळी,शैक्षणिक आदी संस्थाचे अतिशय आस्थेने काम करणारे नेतृत्व म्हणुन भागचंदभाऊ चे नाव स्मरणात राहील असे गोरे सरांनी आपल्या आठवणी पर मनोगतात स्पष्ट केले.शेवटी जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला आव्हाड व्ही.एम आव्हाड, तुपसैंदर डी. व्ही, व्ही. एन. कार्ले,एन.के.बडजाते ,जाधव ई.एल,कोताडे ए.जे,शिरसाळे एस.एन,आदी शिक्षक, सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.