$type=ticker$snippet=hide$cate=0

वर्दीतील आंबटशौकिनपणा आणि विकृती

कायदा व सुव्यवस्था राखणं, कुणावर अन्याय होत असेल, तर तो दूर करणं, पीडितांना न्याय मिळवून देणं हे पोलिसांचं काम आहे; परंतु कुंपणच जसं शेत खाय...


कायदा व सुव्यवस्था राखणं, कुणावर अन्याय होत असेल, तर तो दूर करणं, पीडितांना न्याय मिळवून देणं हे पोलिसांचं काम आहे; परंतु कुंपणच जसं शेत खायला लागतं, तसं वर्दीच जर चुकीचं वागायला लागली, तर दाद कुणाकडं मागायची, असा प्रश्‍न निर्माण होतो. वर्दीचा धाक, वर्दीचा आदर कमी होऊ द्यायचा नसेल, तर वर्दीतील माणसांनी तसं वागलं पाहिजे; परंतु आता वर्दीच गैरकृत्यं करीत असेल, तर तिलाच वठणीवर आणण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र 25 वर्षांपूर्वी वे


गवेगळ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी गाजत होता. त्यात जळगाव अग्रभागी होतं. लैंगिक अत्याचार आणि जळगाव असं जणू समीकरण झालं आहे.  1995 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात राजकीय व्यक्ती, अधिकारी अडकले होते. मीरा बोरवणकर, दीपक जोग यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा तपास केला. एक वर्ष उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळं त्यातील आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यावेळी काँग्रेसच्या एका नगरसेवकासह अन्य नेते, अधिकारी अडकले होते. कोणताही गुन्हा सिद्ध व्हायचा असेल, तर पुराव्यांची साखळी जमा करावी लागते. त्या वेळी पाचशे मुली, महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं जात होतं; परंतु सामाजिक बदनामीमुळं फार कुणी पुढं आलं नाही. असं असलं, तरी काहींना चार वर्षे तुरंगात काढावी लागली. जळगावच्या लैंगिक अत्याचारावर त्या वेळी लज्जा नावाची मालिका आली होती. त्याचवेळी श्रीरामपूर, परभणीतील लैंगिक अत्याचाराची प्रकरणंही गाजली होती. त्या वेळी राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी या लैंगिक अत्याचार प्रकरणात गुंतलेले होते. उशिरा गुन्हे दाखल झाल्यानं त्यात आरोप सिद्ध करणं अवघड झालं होतं. महिला अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करायचा असतो, तेच महिलांवर अत्याचार करायला लागले, तर महिलांनी न्याय कुणाकडं मागायचा, असा प्रश्‍न पडतो. आता जळगावमध्ये तसंच घडलं आहे. या पोलिसांची वृत्ती आंबटशौकिनातील नाही, तर त्याहून अधिक त्यांची विकृती आहे, हे त्यांच्या कृत्यावरून लक्षात येतं. मुळात मुलींच्या सरकारी वसतिगृहात अधीक्षिका असतात. अन्य कर्मचारीही प्रामुख्यानं महिलाच असतात. फक्त सुरक्षा रक्षक तेवढा पुरुष असतो. तिथं बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नसतो, तरीही पोलिस आणि बाहेरच्या काही व्यक्ती  तिथं येत असतील, तर त्यात समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारीही तेवढेच दोषी आहेत.पोलिसांनाही रात्री मुलींची चौकशी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळं जळगावत जे घडलं, तो वर्दीचा विकृतपणाच आहे. जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं. मुलींचा विवस्त्र नाच पाहण्यात  पोलिस आणि काहींनी आनंद मानला; परंतु हा आनंद नाही, तर विकृती आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हारयल झाला. जिल्हाधिकार्‍यांनाही तो मिळाला. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला. विधानसभेत या मुद्यावर गंभीर चर्चा झाली. आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी सरकारच्या आश्‍वासनावर संताप व्यक्त करताना सरकारला असे प्रकार थांबविता येत नसतील, तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली. हा औचित्यभंग असला, तरी जळगावमधील मुलींच्या वसतिगृहात जो प्रकार झाला, त्याविषयीची चीड आहे. जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपच्या आमदार श्‍वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावलं गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे, की या पोलिसांचं निलंबन करावं, अशी मागणी श्‍वेता महाले यांनी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमानं कारवाई होईल असं आश्‍वासन दिलं आहे. घटना घडल्यानंतर लगेच निलबंन करता येत नाही. त्याची चौकशी करावी लागते; परंतु मंत्रिपद भोगलेल्या मुनगंटीवार यांना मात्र सरकारला अडचणीत आणण्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झालेली दिसते. जळगावमधील आशादीप वसतिगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं. अर्थात अगोदर श्‍वेता महाले यांनी मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेतो असं दिलेलं त्रोटक उत्तरही हा प्रश्‍न गांभीर्यानं घेतलेला नाही, याचंच निदर्शक होतं. आई बहिणी सुरक्षित नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. त्यावर नवाब मलिक यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देऊ नका हे वाक्य रेकॉर्डवरून काढा अशी मागणी केली. जळगावच्या आशादीप वसतिगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी डान्स करायला लावल्याबाबत या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्यानं ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. तेवढंच नाही, तर पुराव्यादाखल त्यांनी व्हिडीओही सादर केला.

जळगावातील ‘आशादीप महिला शासकीय वसतिगृह’ ही संस्था विधवा, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसंच कुमारी माता, मुली, अनाथ मुलं यांना आधार देते. त्यांच्या फक्त समस्या सोडवण्यापुरतं हे मर्यादित नसून अनेक मुलींचे संसार थाटले गेले आहेत. 1983 मध्ये या वसतिगृहाची स्थापना शहरात करण्यात आली, तर 2006 पासून यास आश्रयगृह म्हणून घोषित करण्यात आलं. आज येथील महिला व मुली स्वबळावर उभ्या राहण्याचं प्रशिक्षण घेत असून यात त्या यशस्वी झाल्या आहेत. एकीकडं असं चांगलं काम करीत असताना दुसरीकडं पोलिस आणि काही आंबटशौकिनांना पैसे घेऊन महिला वसतिगृहात प्रवेश कोण देत होतं, याची चौकशी व्हायला हवी. या घटनेची गंभीर दखल आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. जळगावच्या महिला वसतिगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जळगावच्या घटनेच्या चौकशीसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलिस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीनं नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला. काही कर्मचार्‍यांच्या संगनमतानं बाहेरील लोकांना आणि पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केलं जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. मुली बाहेरुनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचार्‍यांकडून मज्जाव केला जात होता. जिल्हाधिकार्‍यांकडं या कृत्याचा व्हिडीओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. केवळ जळगावमध्ये असा प्रकार घडला नसून  बीड आणि सोलापुरातही असे विकृत प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. गोरगरीब, निराधार मुले-मुली शिक्षणासाठी अशा वसतिगृहांत राहतात. असे प्रकार घडले, तर त्यांच्या शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद होतील, हा धोका आहे. सोलापुरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडला. तिथं आरोपी वर्दीतील लोक नाहीत, तर कोरोनाबाधित आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. रुग्णांना जागा कमी पडत असल्यामुळं राज्यातील अनेक वसतिगृहांचा उपयोग कोव्हिड सेंटरसाठी करण्यात येत आहेत; मात्र सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर येथील मुलींच्या वसतिगृहात किळसवाणा प्रकार घडला. या ठिकाणी राहणार्‍या मुलींच्या कपड्यावर स्वतःचा फोन नंबर लिहून त्यावर अश्‍लील लिखाण करण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर त्यांची महत्वाची वस्तू आणि सामानांची चोरी करण्यात आली. तसंच काही महत्वाची कागदपत्रंदेखील फाडून टाकण्यात आली. हा सर्व प्रकार तिथं आयसोलेशनमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेनं मोबाईलमध्ये चित्रित करून एका मुलीला पाठविला आहे. या वसतिगृहात दारुच्या बाटल्यादेखील आढळून आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर त्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीत लघुशंका करून कपाटात ठेवण्यात आल्या आहेत. काही मुलींच्या लॅपटॉपमध्ये त्यांचा खासगी डाटा आहे. त्याचा दुरुपयोग करण्याची भीती मुलींनी व्यक्त केली आहे. गृहमंत्री देशमुख आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अशा प्रकरणात कठोर कारवाई करून संबंधितांना अद्दल घडवायला हवी. तसं केलं, तरच यापुढचे असे विकृत प्रकार टाळता येतील.





Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वर्दीतील आंबटशौकिनपणा आणि विकृती
वर्दीतील आंबटशौकिनपणा आणि विकृती
https://1.bp.blogspot.com/-uXObOGX8iFs/YEDWZL487bI/AAAAAAABovs/7UyjviuOCTM_EaxGEVzJWd-83eYJ5SrfwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-uXObOGX8iFs/YEDWZL487bI/AAAAAAABovs/7UyjviuOCTM_EaxGEVzJWd-83eYJ5SrfwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_25.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_25.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content