$type=ticker$snippet=hide$cate=0

व्हीआरडीईचे स्थलांतर नाही ; डीआरडीओचे खासदार विखे यांना पत्र; वादावर पडदा

अहमदनगर/प्रतिनिधी: नगरच्या ‘व्हीआरडीई’ या लष्करी संस्थेचे कुठेही स्थलांतर होणार नाही, उलट तेथे नवे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत, असे पत्र...



अहमदनगर/प्रतिनिधी: नगरच्या ‘व्हीआरडीई’ या लष्करी संस्थेचे कुठेही स्थलांतर होणार नाही, उलट तेथे नवे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत, असे पत्र दिल्लीतील ’डीआरडीओ’ने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या स्थलांतराच्या चर्चेवर आता पडदा पडला असून कामगार आणि ग्रामस्थांनी निश्‍चिंत राहावे, असे आवाहन डॉ. विखे यांनी केले आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून नगरमधील ही लष्करी संस्था अन्यत्र हलविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. याला कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलनेही केली. विविध पक्षाच्या नेत्यांना शिष्टमंडळे भेटली. खासदार विखे यांनीही यामध्ये लक्ष घातले होते. याविषयावर वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार अलीकडेच नवी दिल्लीतील डीआरडीओ भवनमध्ये विखे यांनी डीआरडीओचे चेअरमन रेड्डी, संजीव जोशी आणि डीआरडीओच्या विविध विभागातील प्रमुख अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये नगरच्या व्हीआरडीई संदर्भात चर्चा झाली. याबाबत विखे म्हणाले, ‘या मुद्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. व्हीआरडीईमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, अरणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सर्वांना सांगण्यास मला आनंद होत आहे, की व्हीआरडीईचे कोठेही स्थलांतर होणार नाही. यासंबंधी वरिष्ठ अधिकार्‍यांचे आपल्याला लेखी पत्र मिळाले आहे. या पत्रात व्हीआरडीईमध्ये तूर्तास कुठलेही बदल आणि स्थलांतर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट व्हीआरडीईमध्ये नवीन प्रकल्प सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 



कामगारांचा जीव भांड्यात

या संस्थेचे चेन्नईत स्थलांतर होणार असल्याची चर्चा जानेवारी महिन्यापासून सुरू झाली होती. नगर-दौंड रस्त्यावर ही संस्था आहे. ही संस्था संरक्षण विभागाच्या अंतर्गत येते. संस्थेच्या देशभरात 52 शाखा आहेत. त्यातील नगरची एक शाखा आहे. व्ही.आर.डी.ई मध्ये सध्या वैज्ञानिक, अधिकारी, व कार्माचारी मिळून सुमारे 500 कर्मचारी आहेत. तसेच 400 स्थानिक कर्मचारी कराराने व 100 शिकवू कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास 1000 कुटुंबांचा उदार्निवाह व्ही.आर.डी.ई च्या माध्यमातून होत आहे. ती बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत असल्याने कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10849,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17469,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14778,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: व्हीआरडीईचे स्थलांतर नाही ; डीआरडीओचे खासदार विखे यांना पत्र; वादावर पडदा
व्हीआरडीईचे स्थलांतर नाही ; डीआरडीओचे खासदार विखे यांना पत्र; वादावर पडदा
https://imgk.timesnownews.com/story/1555514970-sujay_vikhe_patil_facebook.jpg?tr=w-1200,h-900
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_268.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_268.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content