$type=ticker$snippet=hide$cate=0

वनमंत्र्यांची शिकार का झाली?

राज्यात दोन मंत्र्यांवर महिलांशी संबंधित आरोप झाले. दोन्हींच्या राजीनाम्याची मागणी झाली. विरोधकांनी भांडवल केलं. दोन्ही प्रकरणात राज्यातील स...

राज्यात दोन मंत्र्यांवर महिलांशी संबंधित आरोप झाले. दोन्हींच्या राजीनाम्याची मागणी झाली. विरोधकांनी भांडवल केलं. दोन्ही प्रकरणात राज्यातील सत्ताधारी पक्षाची बदनामी होत होती; परंतु तरीही संजय राठोड यांनाच राजीनामा का द्यावा लागला, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. 

 महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सव्वा वर्ष होत आलं आहे. या सव्वा वर्षात सरकारविरोधात अनेक आरोप झाले. त्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचं ते काम असतं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भारतीय जनता पक्षानं अनेक आर्थिक आरोप केले; परंतु त्याचा परिणाम सरकारवर फारसा झाला नाही. गेल्या दोन महिन्यांत मात्र मंत्र्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे निघाल्यानं सरकारला बॅकफूटवर यावं लागलं. त्यातही विरोधी पक्षानं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत दाखविलेल्या आक्रमकतेत फरक होता. मुंडे यांच्यावर कारवाईचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते; परंतु आरोप करणार्‍या तरुणीचे कारनामे समोर आल्यानंतर पवार यांनी त्यांना अभय दिलं. भाजप आणि मनसेच्या नेत्यांनीच संबंधित तरुणीच्या ब्लॅकमेलिंगच्या पद्धतीवर प्रकाश टाकला. त्यातच मुंडे यांनी याबाबत न्यायालयातील दावे निदर्शनास आणले. दोन्ही बहिणी मुंडे यांनाच ब्लॅकमेलिंग करीत होत्या, तर राठोड यांच्याबाबतीत त्यांच्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप आणि भेटीचे फोटो पुरावे म्हणून समोर येत होते. मुंडे यांच्या प्रकरणात आरोप करणार्‍या महिलेनं तक्रारच मागं घेतली, तर राठोड यांच्याबाबतीत पूजाच्या आईवडीलांनी कोणतीही तक्रार केली नाही; परंतु तिच्या चुलत आजीनं तक्रार केली. राठोड यांच्या समर्थनार्थ अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस धावली होती; परंतु जेव्हा कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली करून राठोड शक्तीप्रदर्शन करायला लागले, तेव्हा पवार यांनी थेट नाराजी व्यक्त केली. मुंडे आणि राठोड यांच्या प्रकरणात काँग्रेसनं मात्र सावध भूमिका घेतली होती. आता मात्र राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली; परंतु विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही दोन प्रकरणं वेगवेगळी असल्याचं सांगून मुंडे यांच्याबाबतीत फार आक्रमक पवित्रा घेतला नाही. सरकार सत्तेवर आल्यापासून त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करायचं, त्याच्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण करायचं आणि स्वतः च न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून शिक्षा करून मोकळं व्हायचं, असे प्रकार भाजप करीत आहे; परंतु त्यातून हाती काहीच लागलं नाही. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात विरोधक तोंडघशी पडले. वास्तविक राज्यात इतके गंभीर मूलभूत प्रश्‍न आहेत, की त्यावरून सरकारची कोंडी करणं शक्य आहे; परंतु मूलभूत प्रश्‍नांऐवजी भावनिक आणि अन्य प्रश्‍नांतच विरोधकांना जादा रस आहे, हे दिसतं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गेल्या अठरा दिवसांपासून राज्याचं राजकीय वातावरण गरम होतं. संजय राठोड काही काळ गायब झाल्यामुळं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं. राठोड यांच्यावरून शिवसेनेतच दोन गट पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्यापासून सामाजिक अंतर भान राखलं, तेव्हाच त्यांच्या हे लक्षात यायला हवं होतं. अगोदर राठोड राजीनामा द्यायला तयार होते; परंतु नंतर त्यानंतर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यानं त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागं घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयक नियमांना गांभीर्यानं घेतलं आहे. पवारही त्याबाबतीत फार कठोर आहेत. अशा परिस्थितीत राठोड यांनी पोहरादेवी मंदिराजवळ शक्तीप्रदर्शन केलं. कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली झाली. विरोधक मुख्यमंत्र्यांवर या नियमांवरून तुटून पडत असताना राठोड यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलित दिलं. पोहरादेवी मंदिराजवळील गर्दीमुळं कोरोनाचा प्रसार झाला. महंतासह 18 जणांना बाधा झाली. त्यामुळं राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार, अशी चर्चा होऊ लागली. अखेर रविवारी राठोड यांना ठाकरे यांच्याकडं आपला राजीनामा सुपुर्द करावा लागला. एकनाथ शिंदे यांनी अखेरपर्यंत राठोड यांची पाठराखण केली. राठोड यांनीही राजीनामा घ्या; परंतु राज्यपालांकडं पाठवू नका. चौकशीत दोषी आढळलो, तर राजीनामा मंजूर करा असा दबाव आणायचा प्रयत्न केला; परंतु विरोधकांचा आक्रमकपणा आणि स्वकीयांची नसलेली साथ आणि विधानसभेच्या अधिवेशनाअगोदर विरोधकांच्या आरोपांच्या फुग्याला टाचणी लावण्याची संधी यामुळं राठोड यांचा राजीनामा मंजूर करावा लागला. राष्ट्रवादी आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालते; परंतु  आम्ही पाठीशी घालत नाही, पक्षाच्या प्रतिमेची आम्हाला चिंता आहे, असं दाखवण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न म्हणूनही राजीनामा मंजुरीकडं पाहावं लागेल. राठोड यांनी 23 फेब्रुवारी रोजी पोहरादेवीचे दर्शन घेतलं. पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. राठोड यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गर्दी केली. पोलिसांना लाठीमार करावा लागला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचंही उल्लंघन त्या ठिकाणी झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले. पोहरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्तानं राठोड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. बंजारा समाज आपल्या पाठीशी उभा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला; पण हे दबावतंत्र राठोड यांच्या कामी आलं नाही. पंधरा दिवस गायब असताना थेट पोहरादेवी मंदिराजवळ राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केलं. त्यात कोरोना काळात अशी गर्दी केल्यानं टीका झाली. त्यामुळं ठाकरे नाराज होते. असे गंभीर आरोप होत असताना फरार होऊन मग समाजाला ढाल बनवल्यानं लोकांमध्येही चुकीचा संदेश गेला, हे ठाकरे यांच्या लक्षात आलं. धनंजय मुंडे प्रकरण हे व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित होतं. सहमतीनं असलेले संबंध आणि त्यातून निर्माण झालेले वाद न्यायालयात गेले होते. त्यामुळं धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणाची तुलना होऊ शकत नाही. केवळ नैतिकतेच्या आधारावर टीका होऊ शकते. बलात्काराचा आरोप करणार्‍या महिलेनंही तक्रार मागं घेतली; पण संजय राठोड प्रकरण गुन्ह्याशी संबंधित आहे. यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. यात समोर आलेले व्हिडिओ, ऑडिओ संशय निर्माण करणारे आहेत. त्यातही ऑडिओ, फोटो यांच्याबाबत काहीच स्पष्टीकरण न देता केवळ समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं पालुपद राठोड यांनी लावलं. मुंडे प्रकरणातही भाजपकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली; पण भाजप नेत्यांची भूमिका संमिश्र होती. तसं राठोड यांच्याबाबतीत झालं नाही. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. किरीट सोमय्या महिलेच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी पोलिस ठाण्याला पोहचले; पण त्याचवेळी भाजपचेच नेते कृष्णा हेगडे यांनी समोर येत आरोप करणार्‍या महिलेवरच आरोप केले. 2010 मध्ये या महिलेनं आपल्यालाही त्रास दिला होता, असा आरोप त्यांनी केला. फडणवीस यांनी मात्र सावध भूमिका घेतली. मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं ते म्हणाले होते. राठोड प्रकरणात मात्र भाजप पहिल्या दिवसापासून आक्रमक दिसला. भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ सातत्यानं विविध पुरावे समोर आणत असताना संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. राठोड एवढे दिवस गायब असल्यानं भाजपलाही जोरदार आरोप करण्याची संधी मिळाली. त्यात पुराव्याप्रमाणे अनेक गोष्टी समोर येत होत्या. भाजपला त्याचीही मदत झाली. मुख्यमंत्री, गृहमंत्री समोर येऊन भूमिका घेत नसल्यानं भाजप आणखी आक्रमक झाला. राठोड यांनी आरोप झाल्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवसांनंतर आपलं स्पष्टीकरण दिलं. त्यातही पुराव्यांना आव्हान दिलं नाही, तर केवळ आपली बदनामी होत असल्याचं ते म्हणाले. राठोड यांनी या अशा सर्व क्लिप्ससंदर्भात स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. संभाषणात त्यांचा आवाज नव्हता तर मग त्यांनी समोर येऊन हे स्पष्ट का केलं नाही? असाही प्रश्‍न उपस्थित होतो. त्यातच पूजाशी त्यांचा काय संबंध होता आणि तिचा मोेबाईल कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायला ते अरुण राठोडला का सांगत होते, याचं उत्तर शेवटपर्यंत मिळालं नाही. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात यश आलं. त्यामुळं राठोड प्रकरणात शिवसेनेची होत असलेली बदनामी पक्षाला आणि ठाकरे यांना परवडणारी नव्हती. त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा लागला.


 


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वनमंत्र्यांची शिकार का झाली?
वनमंत्र्यांची शिकार का झाली?
https://1.bp.blogspot.com/-rrOXhc9x6-4/YDzo5mvZL2I/AAAAAAABorI/2D3lWSakzo0mb_UcljqCdkoEEoshd9TKACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-rrOXhc9x6-4/YDzo5mvZL2I/AAAAAAABorI/2D3lWSakzo0mb_UcljqCdkoEEoshd9TKACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_27.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_27.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content