वडूज / प्रतिनिधी : वर्धनगड, ता. खटाव येथील किल्यावर अचानक वानवा लागल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्यांसह गावातील ग्रामस्थांनी एकजूट दाख...
वडूज / प्रतिनिधी : वर्धनगड, ता. खटाव येथील किल्यावर अचानक वानवा लागल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्यांसह गावातील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत वणवा विझवला.
याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वनविभागाच्या परिसरात वणवे लागत आहेत. वर्धनगड, ता. खटाव येथील किल्यावर सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास वणवा लागण्याची घटना घडली. यावेळी गावातील ग्रामस्थ, युवक, वनविभाग समितीचे अध्यक्ष यांनी एकत्र येऊन घटनास्थळी जाऊन किल्ल्यावर लागलेला वणवा काही वेळातच विझवण्यात आला.
यावेळी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. शीतल फुंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थाचे कौतुक केले. वर्धनगड किल्ल्याचे संवर्धन व जंगल पर्यावरणाचे सर्वेक्षण करणेकमी ग्रामस्थांनी चांगला सहभाग नोंदवून चांगला आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. शीतल फुंदे यांनी केले आहे.