$type=ticker$snippet=hide$cate=0

बोठेने केला होता जीवन संपवण्याचा विचार ; खिशात सापडली सुसाईड नोट, रस्त्यात केल्या आरोग्याच्या तक्रारी

 अहमदनगर/प्रतिनिधी-रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेने फरार असल्याच्या काळात स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार केला होता. त्याला पोलिस...


 अहमदनगर/प्रतिनिधी-रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेने फरार असल्याच्या काळात स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार केला होता. त्याला पोलिसांनी पकडल्यावर त्याच्या खिशात स्वहस्ताक्षरातील सुसाईड नोट सापडली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीच ही माहिती रविवारी पत्रकारांना दिली. 

    दरम्यान, हैदराबादहून त्याला पारनेरला आणताना त्याने रस्त्यात स्वतःच्या आरोग्याबाबत अनेक तक्रारी केल्या. बरे वाटत नसल्याचे तो सांगत होता. त्यामुळे सोलापूर येथे आकाश हॉस्पिटलमध्ये त्याची फिटनेस चाचणी करून त्याला पारनेरला आणले, असेही पाटील यांनी सांगितले. शनिवारी सकाळी बोठेला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली होती. त्यात त्याच्या खिशात सुसाईट नोट सापडली. यात त्याने, माझ्या नैसर्गिक वा अपघाती मृत्यूनंतर खालील लोकांना संपर्क करावा, असे म्हणून त्यात कुटुंबीयांची नावे व फोन नंबर दिले आहेत. मृत्यूला कोणाला जबाबदार धरण्याबाबत त्यात काही उल्लेख नाही, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.


 म्हणून फॉर्च्युनरमध्ये आणले

बोठेला शोधण्यासाठी गेलेल्या पथकांनी हैदराबादमध्ये महाराष्ट्र पासिंगची केवळ एकच गाडी वापरली. स्थानिक स्तरावर फॉर्च्युनर, स्क्रेटा व स्कॉर्पिओ गाड्या घेण्यात आल्या होत्या. गाडीमध्ये बसण्याच्या तीन रांगा असलेल्या फॉर्च्युनरमध्ये बोठेला पाठीमागे बसवले होते. त्याच्यापुढे दोन अधिकारी बसले होेते. त्यांना ओलांडून तो चालकाचे स्टेअरिंग पकडू शकत नव्हता. मागे सातार्‍यात गाडीत बसलेल्या एका आरोपीने चालकाचे स्टेअरिंग फिरवल्याने गाडी पलटी झाली व तो पळून गेला होता. त्यामुळे बोठेला अशी संधी मिळू नये म्हणून पूर्ण काळजी घेऊन त्याला पारनेरपर्यंत आणले गेले, असे सांगून पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, हैदराबादमध्ये आरोपीला संरक्षण देणारे नेटवर्क मोठे होते. त्याचा वकील मित्र व त्यांचे 3 साथीदार पकडल्यावर त्या लोकांनी बोठेला दुसरीकडे शिफ्ट केले होते. त्यामुळे मग शुक्रवारी रात्रीच बिलालनगर परिसरातील 5 हॉटेल्समध्ये त्याचा शोध घेतला. अखेर पहाटे सहाव्या हॉटेलमध्ये त्याचा शोध लागला, असे पाटील म्हणाले.


 हायकोर्टात जाण्याचा होता प्रयत्न

आपण फरार नाही आहोत व आपण पोलिसांना सहकार्यच करतो, हे दाखवण्यासाठी बोठे हैदराबादमधील रासकोंडा पोलिस ठाण्यात गेला होता व तेथे त्याने स्वतःच्या नावाची नोंद करून तो लगेच निघून गेला. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तेथे आल्याचे दिसले आहे. यातून हैदराबाद उच्च न्यायालयात दाद मागण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले, असे सांगून पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, बोठेला पोलिसांनी कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही. त्याने स्वतःला काही करून घेऊ नये म्हणून त्याच्या कोठडीत सीसीटीव्ही लावले गेले आहेत. इतर आरोपींसमवेत त्याला ठेवले तर, त्यांनी मारहाण केल्याची तक्रारही बोठे करू शकतो. त्यामुळे त्याला त्याच्या कोठडीत एकटेच ठेवले आहे. जरे यांच्या हत्येच्या गुन्ह्यासह 10 लाखाची खंडणी व विनयभंग या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांना करायचा असल्याने पुरेशी काळजी घेऊन पोलिस या गुन्ह्यांची उकल करणार आहेत, असे ते म्हणाले.


तीन पानभर काढले मुद्दे

102 दिवसांपासून फरार असलेला बोठे अखेर सापडल्याने व आता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याने पोलिसांनी त्याच्याकडे आता चौकशीचा मोहरा वळवला आहे. तब्बल विविध मुद्दे असलेल्या तीन पानांची यादी तयार करून त्या मुद्यांचे स्पष्टीकरण त्याच्याकडून घेतले जाणार आहे. हैदराबादचा वकील जनार्दन अकुला याची सहायक वकील पी. अनंतलक्ष्मी सुब्बाचारी फरार असून, तिचा शोध सुरू आहे. तसेच बोठेला फरार असतानाच्या काळात नगरमधून काहींनी पैसे पाठवल्याचे समजले असून, त्यांचाही शोध सुरू केल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.


त्या सेवेची होती मोठी किंमत

बोठेने हैदराबादच्या उस्मानीया विद्यापीठातून पीएच.डी पदवी मिळवली तेव्हा वकील जनार्दन अकुलाशी त्याची मैत्री झाली. हा वकील उच्च न्यायालयात वकिली करतो. पण गुन्हेगारांना मोठी किंमत घेऊन राहायला घर, मोबाईल, फोन, टॅब, टायपिंग व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत असतो, असेही पाटील यांनी सांगितले.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बोठेने केला होता जीवन संपवण्याचा विचार ; खिशात सापडली सुसाईड नोट, रस्त्यात केल्या आरोग्याच्या तक्रारी
बोठेने केला होता जीवन संपवण्याचा विचार ; खिशात सापडली सुसाईड नोट, रस्त्यात केल्या आरोग्याच्या तक्रारी
https://1.bp.blogspot.com/-tX240uz5PGk/YE4c1GeI-EI/AAAAAAABo9Q/19CnRctaw8gE4Zi4KMzdqmMn20QUZkLrACLcBGAsYHQ/s320/Bal%2Bbothe.jpg
https://1.bp.blogspot.com/-tX240uz5PGk/YE4c1GeI-EI/AAAAAAABo9Q/19CnRctaw8gE4Zi4KMzdqmMn20QUZkLrACLcBGAsYHQ/s72-c/Bal%2Bbothe.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_304.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_304.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content