$type=ticker$snippet=hide$cate=0

एसटीच्या सेवानिवृत्त वाहकाने फुलवली सफरचंदाची बाग

शिराळा / प्रतिनिधी : देववाडी, ता. शिराळा येथील सेवानिवृत्त वाहकाने डोंगरवाडीच्या शिवारातील माळरानात 12 गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशातील सफ...



शिराळा / प्रतिनिधी : देववाडी, ता. शिराळा येथील सेवानिवृत्त वाहकाने डोंगरवाडीच्या शिवारातील माळरानात 12 गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या रोपांची लागण करून यशस्वी प्रयोग केला आहे. डोंगरात काय कुसळच पिकणार कि म्हणून हिणवणार्या हितचिंतकांना ही मोठी चपराक ठरणार आहे.
जगात अश्यक्य असे काहीच नाही. फक्त करण्याची धमकी आणि उर्मी असावी लागते. त्यासाठी वयाचे बंधन नाही. समाज माध्यमाच्या माध्यमातून नजरेत भरलेले सफरचंदाचे स्वप्न सत्यात उतरवून या अनोख्या प्रयोगाचा शिराळा तालुक्यात झाला. विजय   शिराळा तालुक्यातील देववाडी गावचे विजय सर्जेराव खोत हे एसटीचे सेवानिवृत्त वाहक आहेत. ज्या प्रदेशात सफरचंदाची लागवड केली जाते. त्याठिकाणी मासी लागण केल्यापासून तिसर्‍या वर्षी फळे मिळायला सुरुवात होते. मात्र, विजय खोत यांनी वर्षभरापूर्वी लावलेल्या काही झाडांना चांगल्या दर्जाची फळे दिसू लागली आहेत. विजय खोत एसटीच्या सेवेत होते प्रत्येक वर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करून ऊसा शिवाय केळी, शेवगा, पपई, गुलाब फुले असे वेगवेगळे उत्पादन घेत होते. आता तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी चिकाटी सोडलेली नाही.
सोशल मिडीयाच्या युट्यूबवरील माहिती बघून त्यांनी हिमाचल प्रदेश गाठले. हिमाचल प्रदेशातील विलासपूर येथील शेतकर्‍याची माहिती काढून त्याच्या शेतातील सफरचंदाची बाग बघून एक वर्षापूर्वी त्यांनी सफरचंदाच्या चार वेगवेगळ्या जातीची 175 सफरचंदाची रोपे 200 रुपये प्रमाणे खरेदी करून बुकिंग करून ठेवली. त्यांना नोव्हेंबर 2020 या महिन्यात रेल्वेतून ही रोपे कराड रेल्वे स्थानकावर मिळाली. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी डोंगरवाडी गावाजवळच्या त्यांच्या पत्नीच्या नावे असणार्‍या चार एकर क्षेत्रापैकी 12 गुंठे क्षेत्रावर 33 व्यासाचे खड्डे घेवून त्यामध्ये रोपांची लागण केली. यावेळी त्यांनी प्रत्येक खड्ड्यात दोन ट्रॉली  शेणखत घातले. त्यांचा वडिलांच्या अजारपणामुळे बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे 50 रोपे खराब झाली. मात्र, सध्या असणारी 125 रोपे अतिशय चांगल्या प्रकारे वाढली आहे. खत, औषधांचा शून्य खर्च वर्षभरात केला आहे. पाणी अतिशय कमी लागत असल्यामुळे पाण्याचेही व्याप कमी आहे. जून महिन्यात झाडांची छाटणी केल्यामुळे आत्ता आलेल्या फुटव्यांना चांगली फुलकळी पडली होती त्यातील काही झाडांना फळे लागली आहेत. हार्बन, अण्णा, डोअर शेट गोल्ड या जातीची रोपे सध्या शेतात आहेत. त्यामुळे फळे लागताना मागे पुढे लागत आहेत. पुढील वर्षापासून चांगली फळे मिळणार आहेत. वर्षभरात झाडांना फळे लागली आहेत. याचा अर्थ येथील वातावरण पिकाला पोषक आहे. त्यामुळे पुढील वर्षी फळांची सख्या बघून क्षेत्र वाढवणार असल्याचे  खोत यांनी सांगितले.
  सरासरी 1क्िंवटलपर्यंत उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगीतले. खोत यांनी या सफरचंदाच्या बागेत अंतरपिक म्हणून उन्हाळी भुईमुगाची लागण केली आहे. त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही अंतरपिक म्हणून घेतल्या आहेत. यातही त्यांनी दूरदृष्टी ठेवून प्रयोग केला आहे. झाडांच्या बाजूच्या मोकळ्या क्षेत्रात तण डोके वर काढेल म्हणून त्यांनी अंतरपिके घेतली आहेत. कोणत्याही तणनाशकाचा ते शेतात मारा करीत नाहीत. विजय खोत यांची देववाडी गावात दोन एकर शेती आहे, त्या क्षेत्रात ऊस लागवड आहे.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: एसटीच्या सेवानिवृत्त वाहकाने फुलवली सफरचंदाची बाग
एसटीच्या सेवानिवृत्त वाहकाने फुलवली सफरचंदाची बाग
https://1.bp.blogspot.com/-5FTBEQzZqJA/YEt3mILHAlI/AAAAAAABo5o/rHHnPxz7V8wavrauJ6nmhIUEqrS2w0DWQCLcBGAsYHQ/s320/12-1.jpg
https://1.bp.blogspot.com/-5FTBEQzZqJA/YEt3mILHAlI/AAAAAAABo5o/rHHnPxz7V8wavrauJ6nmhIUEqrS2w0DWQCLcBGAsYHQ/s72-c/12-1.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_306.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_306.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content