$type=ticker$snippet=hide$cate=0

पोलिसांची प्रतिमा का काळवंडते?

  मुंबई/प्रतिनिधी : पोलिस हे जणून सत्ताधार्‍यांचे हातचे बाहुले बनले आहेत. कायदे, नियम, पोलिसांची ठरवून दिलेली कार्यपद्धती हे जणून काही अस्ति...

 



मुंबई/प्रतिनिधी : पोलिस हे जणून सत्ताधार्‍यांचे हातचे बाहुले बनले आहेत. कायदे, नियम, पोलिसांची ठरवून दिलेली कार्यपद्धती हे जणून काही अस्तित्वाच नाही. प्रत्येक कृती आणि तपासही पोलिस सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावरच करतात. विरोधकांवर झालेली प्रत्येक कारवाई ही सत्ताधार्‍यांनी पोलिसांना हाताशी धरून रचलेले षडयंत्रच असते. सत्ताधारी पक्षातील लोकांचे गंभीर गुन्हेही पोलिस पाठीशी घालतात, असाच समज सध्या झाला आहे. अर्थात तसा अर्थ काढला जाऊ शकेल, अशा घटनाही घडत आहेत. 


पोलिसांची आणि एकूण आपल्या कायदा सुव्यवस्थेच्या यंत्रणेची मात्र मोठी बदनामी होत आहे. सामान्य नागरिकांचा याकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलत असून त्यातून कायदा न पाळण्याची वृत्ती वाढून अराजकता माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर केवळ सरकार नव्हे तर सर्वच राजकारण्यांचे हे अपयश असेल, आणि सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. महाराष्ट्र पोलिसांचा त्यातही मुंबई पोलिस दलाचा लौकिक चांगला आहे. तपास आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या पोलिसांची कामगिरी सर्वत्र गौरविण्यात आलेली आहे. असे असले तरी पोलिसांवर सातत्याने शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न होतो. टोकाचा विरोध असलेल्या राजकारणात आता घटना घडामोडींचाही राजकारणासाठी वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे सहाजिकच या खेळात पोलिसही ओढले गेले. गँगस्टर लोकांनी जसा पोलिसांचा वापर केला, तसे आता राजकारणी करतात की काय, अशी शंका येते. बदल्या, बढत्या आणि सोयीच्या जागी नियुक्ती यासाठी पोलिसांना राजकारण्यांची मदत हवी असते. नव्हे जाणीवपूर्वक ती तयार केली गेली. त्यामुळे पोलिसांना आपल्या इशार्‍यावर नाचविणे सोपे जावे, असा त्यामागील हेतू असावा. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर मार्गाने नव्हे तर सरकारची इच्छा आणि सत्ताधार्‍यांच्या ध्येयधोरणांप्रमाणे काम करावे, असा जणू पायंडाच पडत गेला. 

एखाद्या घटनेवरून सरकारला घेरायचे तर पोलिसांवर आरोप करायचे. एखाद्या प्रकरणात विरोधकांना अडकवायचे तर पोलिसांचा वापर करायचा अशा पद्धती पडत गेल्या. यात पोलिसही अडकत गेले. लोकांच्या मनातही तशीच प्रतिमा निर्माण होत गेली. पोलिसांची ही प्रतिमा सर्वांसाठीच घातक आहे. एक तर यामुळे पोलिस सामान्य माणसांपासून दुरावणार आहेत. त्यांना तपासात आणि कायदा सुव्यवस्थेत मदत करणारा महत्वाचा घटक दुरावणे परवडणारे नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण अथवा गुन्हेगारीचे राजकारण होणे ही चर्चा जुनी झाली. गुन्हेगारांना हाताशी धरून डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा पोलिस अधिकार्‍यांनाच हाताशी धरून आपलं ईप्सित साध्य करणे राजकारण्यांना अधिक सोपे वाटू लागले. अनेक पोलिस अधिकारी या ना त्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या कच्छपी लागलेले दिसतात. 24 वर्षांपूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्तपद भूषविलेल्या रामदेव त्यागींपासून अलीकडच्या सचिन वाझेंपर्यंत अनेक पोलिस अधिकार्‍यांनी राजकीय झूल वापरली आहे. पोलिस अधिकार्‍यांनाही वैयक्तिक राजकीय मते असू शकतात आणि त्यात गैरही काही नाही; मात्र कर्तव्य बजावताना त्या पक्षाच्या आहारी जाता कामा नये अथवा पदाचा गैरवापर करू नये, अशी अपेक्षा असते. अगदी काही आयपीएस अधिकारीही अमुक एका नेत्याच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. त्या नेत्याचा पक्ष सत्तेवर आला की उत्तम पोस्टिंग मिळतात आणि तो पक्ष विरोधी पक्षात बसला की रवानगी कोनाड्यात होते. राजकीय वरदहस्ताने काही अधिकारी बेभान होतात आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यागत कामाला लागतात. दबंग अधिकारी उदयास येतात ते अशी राजकीय कवचकुंडले मिळाल्यावरच. 1992-93 साली मुंबई दंगलीच्या काळात रामदेव त्यागी मुंबईत सहपोलिस आयुक्तपदी होते. 9 जानेवारी 1993 रोजी त्यागी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने महंमद अली रोडवरील सुलेमान उस्मान बेकरीतून पोलिसांवर एके 47 मधून गोळीबार झाल्याचा कांगावा करीत बेकरी आणि लगतच्या मदरशावर गोळीबार करून नऊ जणांना कंठस्नान घातले. त्यागी यांच्या आदेशामुळे नऊ निरपराध्यांचे हकनाक बळी गेल्याचा आरोप झाल्याने ते प्रकरण बरेच गाजले. तपासाअंती सुलेमान उस्मान बेकरीतून गोळीबार झाल्याचे पोलिस सिद्ध करू शकले नाहीत.  त्या काळात विरोधी पक्ष असलेली शिवसेना दंगलीनंतरच्या निवडणुकीत सत्तेवर आली आणि रामदेव त्यागी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी विराजमान झाले. पुढे 2001 साली महाराष्ट्र सरकारच्या विशेष कृती दलाने सुलेमान बेकरी प्रकरणात रामदेव त्यागी यांच्यासह 18 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन वर्षांनी त्यागींसह 9 पोलिसांची सुटका करण्यात आली; आणि इतरांविरुद्ध खटला सुरू राहिला. निवृत्त झाल्यानंतर त्यागी यांनी रीतसर शिवसेनेत प्रवेश केला. कुशल तपास अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन वाझे यांची प्रतिमाही सध्या चर्चेचा विषय झाली आहे. 2002 साली घाटकोपर येथील बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप असणार्‍या सय्यद ख्वाजा युनूस पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेल्याचा बोभाटा झाला.  त्या प्रकरणात निलंबन झालेल्या वाझे यांनी 2007 साली पोलिस सेवेचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वाझे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणांची पाहणी करताना दिसले. वाझे शिवसेनेसाठी करीत असलेले काम अन्य पक्षांच्या चांगलेच लक्षात आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पोलिस खात्यात अपुर्‍या मनुष्यबळामुळे 6 जून 2020 रोजी सचिन वाझेंसह काही निलंबित अधिकार्‍यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले. त्यांच्या हातून आता काही आगळीक होणार नाही, अशी अटकळ असतानाच ते हिरेन प्रकरणात अडकले आणि त्यांची बाजू सावरण्याची पाळी पुन्हा शिवसेनेवर आली. अजित पवार यांनी मध्यंतरी पुण्यात पोलिस अधिका-यांच्या एका समारंभात बोलताना पोलिस अधिकार्‍यांनी बैठकीला येताना सरकारी वाहनांचा वापर करावा अन्य कुणी पुरवलेल्या आलिशान गाड्यांतून प्रवास केला, तर चुकीचा संदेश जातो, असे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर वाझे यांच्याकडे मर्सिडीजसारख्या आलिशान गाड्या कुठून येतात, याची चौकशी पोलिस आयुक्तांना करावीशी वाटली नाही, की त्यांच्यापेक्षाही वाझे मोठे झाले आहेत, याचे उत्तर मिळणार नाही. मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करताना हौतात्म्य पत्करलेले एन्काउंटरफेम पोलिस अधिकारी विजय साळसकर यांनाही शिवसेनेने पूर्वी नेहमीच पाठिंबा दिला होता. शिवसेना-भाजप युती सत्तेवर असताना कुख्यात अरुण गवळी गँगच्या अनेक हस्तकांना कंठस्नान घालण्यात साळसकरांचा सहभाग होता. अखिल भारतीय सेनेचा सफाया झाला आणि शिवसेनेपुढील आव्हान संपुष्टात आले. हत्येच्या आरोपाखाली गजाआड झालेले, सुटल्यावर थेट शिवसेनेच्या तिकिटावरून विधानसभेची निवडणूक लढवणारे (आणि मतदारांनी नाकारलेले) एन्काउंटरफेम अधिकारी प्रदीप शर्मा, आधी भाजप-मग काँग्रेसची छावणी गाठणारे निवृत्त पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ आंग्रे ही आणखी उदाहरणे! सत्ताधारी पक्षाच्या गुड बुकमध्ये असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना लक्ष्य करण्याचा विरोधी पक्षांचा नेहमीचाच शिरस्ता; पण पोलिसांना हाताशी धरून आपला मार्ग मोकळा करण्यात कुठल्याच पक्षाचा अपवाद नाही. नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना तेथेही काहीसे असेच घडले होते. मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून अहमदाबाद येथे 19 वर्षीय इशरत जहाँ हिच्यासह चार जणांना पोलिस उपमहानिरीक्षक डी. जी. वंजारा यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने चकमकीत ठार केल्याचे प्रकरण बरेच गाजले. त्यात गुजरात पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली. गँगस्टर सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणही अंगलट आलेले वंजारा पुढे आठ वर्षे तुरुंगात खितपत पडले. कालांतराने राजकीय गणिते बदलली आणि वंजारा अडगळीत गेले. बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे हेही वादग्रस्त अधिकारी. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला. बस्तर मतदारसंघातून तिकीट मिळेल, असा त्यांचा होरा होता. पण संयुक्त जनता दल आणि भाजप युतीच्या तिकीटवाटपात ती जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि त्यांना हात चोळत बसावे लागले.


Name

] ब्रेकिंग,875,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5955,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,383,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,79,satara,281,satara.,7,solapur,1,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10821,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,743,देश,4589,नाशिक,827,पुणे,850,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17411,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,171,महाराष्ट्र,14719,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4133,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1630,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पोलिसांची प्रतिमा का काळवंडते?
पोलिसांची प्रतिमा का काळवंडते?
https://theprint.in/wp-content/uploads/2019/05/Palghar-police-696x392.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_358.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_358.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content