मुंबई/प्रतिनिधीः स्वस्त कर्ज मिळविण्यासाठी वीज वितरण कंपन्यांना सुधारणा करावी लागेल. या दिशेने आरईसी आणि पीएफसीने डिसकॉमसाठी नवीन मार्गदर्शक...
मुंबई/प्रतिनिधीः स्वस्त कर्ज मिळविण्यासाठी वीज वितरण कंपन्यांना सुधारणा करावी लागेल. या दिशेने आरईसी आणि पीएफसीने डिसकॉमसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्या अंतर्गत आता कर्ज घेण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वीज वितरणाची तूटही कमी करावी लागेल. अर्थसंकल्पात महावितरण कंपन्यांना तीन लाख कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज देण्याची योजना जाहीर केली आहे. वीज वितरण तूट 12-15 टक्क्यांपर्यंत खाली आणावी लागेल. कंपन्यांना 2024-2025 पर्यंत तोटा कमी करावा लागेल. पुढील 4 वर्षांत संभर टक्के स्मार्ट मीटरिंग करावे लागेल. स्मार्ट मीटरिंगसाठी आरईसी/पीएफसी कडून दीड लाख कोटी रुपयांचे कोटी कर्ज देण्यात येणार आहे. तसेच पायाभू त सुविधांसाठी आणखी दीड लाख कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज उपलब्ध होईल. महावितरणने 24 मार्चपर्यंत सूचना मागितल्या आहेत.