$type=ticker$snippet=hide$cate=0

वाझे प्रकरण महाआघाडीला भोवणार

चकमकफेक सचिन वाझे यांना पाठिशी घालण्याची किंमत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागण्याची शक्यता असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...


चकमकफेक सचिन वाझे यांना पाठिशी घालण्याची किंमत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागण्याची शक्यता असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात आणून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थांकडं सोपविण्याची मागणी केली होती. आता राष्ट्रीय तपास संस्थेनं प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनची गाडी उभी करणं आणि या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा खून अशा दोन्ही प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आल्यानं राज्य सरकारही अडचणीत आलं आहे. 


प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या भरलेली गाडी ठेवल्याचा तपास जे सचिन वाझे करीत होते, त्याच वाझेवर जिलेटीन भरलेली गाडी ठेवल्याचा आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा आरोप व्हावा, हे एखाद्या मसालेदार चित्रपटाचं कथानक शोभावं इतक्या रंजकदार पातळीवर आलं आहे. वाझे विमनस्क मानसिक स्थितीत असताना आणि त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असताना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. वाझे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप एनआयनं केला आहे. विशेष म्हणजे वाझे यांनी अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या 15 दिवसांत स्फोटकं  प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातं आहे. अंबानी यांच्याघरासमोर जिलेटीन भरलेली गाडी वाझे यांनी पार्क केली असेल, तर इंडियन मुजाहिदीनच्या तिहार तुरुंगातील दहशतवादी अंबानी यांना धमकीचा मेसेज कसा पाठवू शकतो, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळंच वाझे यांच्या अटकेनं खळबळ उडाली आहे. स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातही वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणीदेखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, एनआयएनं अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडं हस्तांतरीत केलं. या प्रकरणी एनआयए कसून तपास करीत आहे. दुसरीकडं एक व्हाईट इनोव्हा एनआयएच्या अधिकारी कार्यालयात टोईंग करून आणली. गेल्या काही दिवसांपासून एनआयएच्या अधिकार्‍यांकडून या गाडीचा तपास करण्यात येत होता. अंबानींच्या घरच्या बाहेर मिळालेल्या गाडीमध्ये जिलेटीन आढळून आले होते. त्यागाडीच्या पाठीमागं सीसीटीव्हीमध्ये एक इनोव्हा गाडी दिसत आहे. एनआयएनं आणलेली गाडी तीच इनोव्हा कार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. स्फोटकं बाळगणं त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे. वाझे यांना अटक झाली; पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाझे हे शिवसेनेचे प्रवक्ते होते. त्यामुळं आता ओसामा सचिन वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार, हे आता बघावं लागेल. वाझे यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडंच गृहखातं कामाला लागलं. त्यामुळं आता ते वादात सापडलं आहे. शिवसेनेमुळं राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. वाझे यांना अटक होण्यापूर्वी ते अनेकवेळा आयुक्त परमबीर सिंह यांना भेटले होते. या दोघांत दीर्घकाळ चर्चाही झाली होती, तर विधानसभेत देशमुख यांनी वाझे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांनी केवळ वाझे यांची बदली केली होती. त्यामुळं विरोधक प्रचंड संतापले होते. आता पोलिस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एकीकडं वाझे यांना अटक झाली असताना दुसरीकडं त्याच्या काही तास अगोदर वाझे यांनी केलेले व्हॉटस्पवरील स्टेटस्नं खळबळ माजविली आहे. त्यांनी या जगातून निरोपाची भाषा वापरली होती. अधिकार्‍यांनी सांगूनही वाझे यांनी आपले स्टेटस् काढलं नाही. नैराश्यातून त्यांनी हा स्टेटस् ठेवल्याचं बोललं जात आहे. वाझे यांची एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्थांकडून चौकशी केली जात आहे. त्यांचा पाठलाग तपास संस्थांचं वाहन करीत आहे. त्यामुळं वाझे यांनी त्राग्यानं ठेवलेल्या स्टेटस् पाहता त्यांची विमनस्क अवस्था लक्षात येते. तपास संस्थांचा ससेमिरा, न्यायालयानं फेटाळलेला अंतरिम जामीनअर्ज या पार्श्‍वभूमीवर वाझे यांनी आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आल्याचा स्टेटस् ठेवल्याचं बोललं जात आहे. वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकानं तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती वाझे यांनी एटीएसला दिली; मात्र एटीएसनं वाझे यांना अनेक उलटसुलट प्रश्‍न विचारले. या वेळी काही प्रश्‍नांवर त्यांनी समाधानकारक उत्तरं न दिल्यानं आजही एटीएसनं त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. सलग दुसर्‍या दिवशी चौकशी होणार असल्यानं वाझे काहीसे तणावात होते. या प्रकरणातून बाहेर पडणं शक्य नसल्याची जाणीव झाली असावी, म्हणूनच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅेपवर मेसेज ठेवून त्यांची मनस्थितीच विशद केल्याचंही बोललं जात आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वाझे प्रकरण महाआघाडीला भोवणार
वाझे प्रकरण महाआघाडीला भोवणार
https://1.bp.blogspot.com/-ZIo6qdEbx-4/YE32bznkWsI/AAAAAAABo8Q/Pu_NYzD9AbAsNhzYxb2gY6sOBhZwRe6lwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-ZIo6qdEbx-4/YE32bznkWsI/AAAAAAABo8Q/Pu_NYzD9AbAsNhzYxb2gY6sOBhZwRe6lwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_367.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_367.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content