तिरुअनंतपूरम : केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तेत आली, तर गृहिणींच्या कामाचाही सन्मान करत त्यांना ’मासिक पेन्शन’ देण्याची तयारी...
तिरुअनंतपूरम : केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तेत आली, तर गृहिणींच्या कामाचाही सन्मान करत त्यांना ’मासिक पेन्शन’ देण्याची तयारी सत्ताधार्यांनी दर्शवली आहे. या निमित्ताने ’गृहिणींना कामाचा आर्थिक मोबादला’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
केरळमध्ये सहा एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. माकप नेतृत्वाखाली सत्ताधारी ’डावी लोकशाही आघाडी’ने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्या तरुणांसाठी 40 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच गृहिणींना मासिक ’पेन्शन’ देण्याची घोषणा सत्ताधार्यांकडून करण्यात आली आहे. माकपचे राज्य समिती सचिव के विजय राघवन, भाकपचे सचिव कन्नन राजेंद्रन आणि डाव्या लोकशाही आघाडीच्या इतर नेत्यांनी संयुक्तरित्या हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.केरळमध्ये सध्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनराई विजयन हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सध्या मुख्यमंत्री पलक्कड जिल्ह्यात प्रचारसभांत व्यग्र असल्याने ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत.