नवीदिल्ली : दिल्ली सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय राजधानीतील बेरोजगारीचे प्रमाण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये जानेवारी-फेब्रुवारी...
नवीदिल्ली : दिल्ली सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय राजधानीतील बेरोजगारीचे प्रमाण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमधील 11.1 टक्क्यांवरून वाढून 28.5 टक्क्यांवर पोचले आहे. 83 टक्के महिला रोजगारातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. पुरुषांच्या बाबतीत हेच प्रमाण 36 टक्के आहे. या 83 टक्के बेरोजगार महिलांपैकी 16.6 टक्के पदवीधर आहेत, 27.5 टक्के महिलांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे तर 23.8 टक्के महिलांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
महिलांच्या बाबतीत, कोरोननाच्या अगोदर महिलांच्या बाबतीत बेकारीचे प्रमाण 25.6 टक्के होते तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण 8.7 टक्के होते. साथीच्या नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिला बेरोजगारीचा दर वाढून 54.7 टक्के झाला आणि पुरुष बेरोजगारीचा दर 23.2 टक्क्यांवर गेला. भारतात महिला कर्मचार्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आकडेवारीनुसार 2004-05 ते 2011-12 दरम्यान सुमारे दोन कोटी भारतीय महिलांनी काम सोडले, तर याच काळात दोन कोटी 40 लाख पुरुषांना काम मिळाले. 1993-94 काम करणार्या महिलांचे प्रमाण 42 टक्के होते, ते 2011-12 मध्ये 31 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील महिलांच्या तुलनेत देशातील शहरी भागात राहणार्या स्त्रिया घरगुती कामात भाग घेतात. 2011 च्या जनगणनेतील आकडेवारी आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस) च्या नवीन आकडेवारीनुसार भारतातील ग्रामीण महिलांमध्ये महिला कर्मचार्यांची संख्या 81.29 टक्के आहे. यापैकी बहुतेक स्त्रिया शेतमजूर आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सुमारे 56 टक्के महिला अशिक्षित आहेत. अशिक्षित शहरी कामगारांची संख्या 28 टक्क्यांनी कमी आहे. दिल्लीत नोकरी करणार्या सात टक्के लोकांना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दरमहा पाच हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न होते. ऑक्टोबरपर्यंत त्यांचा वाटा 13 टक्क्यांपर्यंत वाढला होता आणि दरमहा दहा ते पंधरा हजार रुपये उत्पन्न मिळविणार्यांचा हिस्सा 300 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत खाली आला होता.