$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबईची बत्ती गुल होण्यामागं ड्रॅगन?

चांगला शेजार मिळणं हे भाग्यच असतं. आपला शेजारी कोण असावा, हे आपल्याला ठरविता येत नाही. देशाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. भारताशी कोणत्या...

चांगला शेजार मिळणं हे भाग्यच असतं. आपला शेजारी कोण असावा, हे आपल्याला ठरविता येत नाही. देशाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. भारताशी कोणत्याही थराला जाऊन शत्रुत्त्व करण्याची चीनची तयारी असते. आर्थिक आणि सीमावरच्या युद्धातच चीन आक्रमक असतो असं नाही, तर त्यानं सायबल हल्ले करून भारताच्या यंत्रणा खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच दिव़शी प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांचा आधार घेतला, तर ते लगेच स्पष्ट होतं.  


    वीजपुरवठा खंडीत होण्याला निसर्ग जसा जबाबदार असतो, तशाच मानवी चुकाही जबाबदार असतात. यंत्रणेत दोष असेल, तरीही वीजपुरवठा खंडीत होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील दोन कोटी लोक अंधारात होते. दोन-तीन दिवस वीज बंद राहिली. त्याला कारण हिमस्खलन होतं. भारताच्या निम्म्याहून अधिक भागात गेल्या दोन वर्षांपूर्वी वीज गायब झाली होती. देशातील या ब्लॅकआऊटला वेगळं कारण होतं; परंतु आता वीज गायब झाली, की त्याला कारण स्थानिक बिघाड एवढंच असणार नाही, तर मुंबईतील अनुभवावरून चीनही असू शकतो. कोणत्याही घटनेशी चीनचा काय संबंध असं कुणाला वाटण्याचा संभव आहे; परंतु तसं नाही. त्याला काही पुरावे आहेत. ग्रीड सेपरेशनमुळे वीज गायब होते. विजेची मागणी अचानक वाढली, तर ग्रीड एकमेकापासून वेगळी होतात. वीज खेचण्याच्या प्रयत्नांत वीज गायब होते. हे आपल्याला माहीत असतं. मुंबईत गेल्या वर्षी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळं जनजीवन किती विस्कळीत झालं, हे आपण अनुभवलं आहे. आतापर्यंत आपण ज्या गोष्टीचा कुणीही कधीही विचार केला नव्हता, ती गोष्ट आता चर्चिली जायला लागली आहे. आता दोन देशातील वाद, युद्ध सीमेवरच खेळली जात नाहीत. ती वेगवेगळ्या अंगानं खेळली जात असतात. आता हॅकर्सही अशा युद्धात सहभागी होत आहेत. गेल्या काही दिवसांत विरोधी देशाच्या यंत्रणा हॅक केल्या जातात. त्यात दळणवळण, संरक्षण, वीज, औषध कंपन्यांसारख्या महत्वाच्या क्षेत्राचा समावेश असतो. चीन सरकारचं समर्थन असणार्‍या एका हँकिंग ग्रुपनं भारतातील कोरोना लसींची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या दोन औषधी कंपन्यांच्या आयटी सिस्टीमवर हल्ला केल्याची माहिती सायफिर्मा या सायबर इंटेलिजन्स फर्मनं दिली आहे. कोरोना लसीच्या उत्पादनावरून भारत व चीनमध्ये फार्मा उद्योगामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यात भारताकडून सर्वाधिक लसींचं उत्पादन केलं जात असल्यानं चीनच्या सायबर हॅकर्सकडून भारतीय कंपन्यांना लक्ष्य केलं जात आहे. सायफिर्मा ही गोल्डमन सॅश या कंपनीची साह्यकारी कंपनी असून ती सिंगापूर व टोकियो येथे कार्यरत आहे. या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, चीनचा हॅकिंग ग्रुप ‘एपीटी-10’ उर्फ ‘स्टोन पांडा’ यानं भारतीय औषधी कंपन्यांच्या आयटी सिस्टीममधील काही कच्चेदुवे शोधून त्यावर हल्ला केला होता. भारतीय औषधी कंपन्यांच्या आयटी सिस्टीममध्ये शिरकाव करून बौद्धिक संपदेची माहिती चोरणं व त्या आधारे भारतीय औषधी कंपन्यांवर व्यवसायावर परिणाम करणं यासाठी चीनचे हे हल्ले असल्याचं ’सायफ्रिमा’चं मुख्य कुमार रितेश यांचं म्हणणं आहे. कुमार रितेश हे ब्रिटनचं गुप्तहेर खातं ’एमआय सिक्स’चे माजी अधिकारी आहेत. या हल्ल्याच्या संदर्भात चीनच्या परराष्ट्र खात्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीरम व भारत बायोटेकनंही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या बातमीच्या अगोदर अमेरिकेच्या एका संस्थेच्या अहवालानुसार मुंबईतील वीजपुरवठा खंडीत होण्यामागंही चीन होता. चीन कुठं कुठं काय काय करामती करीत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईसारख्या महानगरात विजेचं महत्त्व किती आहे आणि वीज नसेल, तर किती अनागोंदी होते, याचा अनुभव गेल्या वर्षी घेतला आहे. गलवान खोर्‍यात चीनला भारतानं जोरदार प्रत्युतर दिल्यानंतर भारताची कोंडी करण्यासाठी मुंबईत ब्लॅकआऊट करण्यात आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

चीनच्या हॅकर्सनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या कंपन्यांच्या आयटी सिस्टीमवरही हल्ला करून शहरातला वीज पुरवठा बंद पाडल्याची घटना उघड झाली. गेल्या वर्षी भारत-चीनमध्ये सीमारेषेवरून तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 12 ऑक्टोबरमध्ये मुंबईच्या वीज यंत्रणांवर सायबर अ‍ॅटक करत शहरातील वीज गायब केली होती. तसंच रेल्वे सेवा, रुग्णालय सेवा ठप्प झाली होती. हे होण्यामागं कारण चीनच्या ’रेडइको’ या हॅकर्स ग्रुपनं भारतीय वीज यंत्रणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते, असा दावा मॅसॅच्युएट्सस्थित एक कंपनी ’रेकॉर्डेड फ्युचर’चं म्हणणं आहे. या कंपनीनं दावा केला, की चीनच्या ’रेडइको’नं भारतातील वीज ग्रीड यंत्रणांना लक्ष्य करण्यासाठी आयटी सिस्टीमवर हल्ले केले होते. चीनच्या ’रेडइको’कडं अत्याधुनिक सायबर इन्ट्रुजन तंत्रज्ञान असून त्यांनी भारताच्या वीज ग्रीड यंत्रणांमध्ये काही नोडमध्ये शिरकाव करून वीज निर्मिती व वीजपारेषण व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक झडपेत भारतीय सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर चीननं भारतात सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या सायबर हल्ल्याचा संबंध थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही तास झालेल्या ब्लॅकआऊटशी आहे. चीननं केलेल्या सायबर हल्ल्यात संपूर्ण शहरातील बत्ती गुल झाली होती आणि ऐन कोरोनाच्या काळात रुग्णालयं जनरेटरवर कार्यरत होती. गलवान हिंसेच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाल्यानं लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या. शेअर बाजार ठप्प झाला होता. वीज गेल्यानं दोन कोटी मुंबईकर अंधारात होते. रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जनरेटर सुरू करावे लागले होते, जेणेकरुन व्हेंटिलेटर सुरू राहतील. हा तोच काळ होता, जेव्हा भारतात कोरोना शिखरावर होता. आतापर्यंतच्या तपासात ही बाब समोर आली आहे, की या सर्व घटना एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. त्या वेळी मुंबईतील ब्लॅकआऊटमागं चीनमधूल झालेला सायबर हल्ला असू शकतो, असा दावा भारतीय अधिकार्‍यांच्या हवाल्यानं करण्यात आला होता. आता त्याला अमेरिकेच्या अहवालानं पुष्टी मिळाली आहे.

या सगळ्या घटना चीनच्या एका मोठ्या सायबर अभियानचा भाग होता, ज्याचा उद्देश भारताचा पॉवर ग्रीड ठप्प करणं हा होता. इतकंच नाही. तर चीननं अशी योजना बनवली होती, की जर गलवानमध्ये भारताचा दबाव वाढला, तर संपूर्ण देशाला अंधारात लोटलं जाईल. हिमालयात सुरू असलेल्या कारवायांदरम्यान चिनी मालवेअरनं भारतातील वीज पुरवठा करणार्‍या यंत्रणेत घुसखोरी केली होती. यामध्ये हायवोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल पॉवर प्लान्टचाही समावेश होता. चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा अमेरिकेतील सायबर फर्म ’रेकॉर्डेड फ्युचर’नं केला आहे; पण यातील काही मालवेअर अ‍ॅक्टिव्ह झालं नसल्यानं मोठा अनर्थ टळला. चीनची कंपनी ’रेड इको’नं सायबर हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे भारताचे सुमारे एक डझन पॉवर ग्रीड गुपचुप पद्धतीनं नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, हे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितलं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत झालेल्या ’पॉवर कट’मागं चीनचा हात असावा असा अंदाज अमेरिकेतील एका कंपनीनं व्यक्त केला असून मुबईतील इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परदेशी कंपनीनं व्हायरस सोडण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे आमच्याकडे तपासाअंती उपलब्ध झाले आहेत; मात्र यामध्ये चीनचा हात आहे का, याबाबत तपास करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र साबर क्राइमनं सुपरवायझरी कंट्रोल डाटा ट्रान्समिशन सिस्टीमबाबत विश्‍लेषण केलं आहे. त्यात त्यांनी यात व्हायरस घुसवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, अशी शक्यता वर्तवली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. सायबर क्राइमनं केलेल्या तपासात प्रामुख्यानं तीन गोष्टी आढळून आल्या आहेेत. यात तपासात 14 ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्यात आल्याचा पुरावा मिळाला आहे. तसंच आठ जीबी डाटा हा परदेशी कंपनीनं महावितरणच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर केलेला असून शकतो, असं सायबर क्राइमनं म्हटलं आहे. तसंच काळ्यायादीतील इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेसच्या माध्यमातून महावितरणच्या सर्व्हरमध्ये लॉगीन करण्याचा प्रयत्न झालेला असावा असंही सायबर क्राइमच्या अहवालात म्हटलं आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईची बत्ती गुल होण्यामागं ड्रॅगन?
मुंबईची बत्ती गुल होण्यामागं ड्रॅगन?
https://1.bp.blogspot.com/-6rvHAUG9nMA/YD4vgtPebMI/AAAAAAABoso/D_4UeTO0ca4ZnluPjChISb_8kwEgyk-FwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-6rvHAUG9nMA/YD4vgtPebMI/AAAAAAABoso/D_4UeTO0ca4ZnluPjChISb_8kwEgyk-FwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_39.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_39.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content