मुंबई/प्रतिनिधीः राजस्थानमध्ये फोन टॅपिंगचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सरकारने फोन टॅप केल्याची विधानसभेत कबुली दिल्याने राज्यातील र...
मुंबई/प्रतिनिधीः राजस्थानमध्ये फोन टॅपिंगचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सरकारने फोन टॅप केल्याची विधानसभेत कबुली दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजीच्या वेळी गेल्या वर्षी गेहलोत सरकारने पायलट गटातील मंत्री आणि आमदारांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, मंत्री आणि आमदारांचे फोन टेप त्यावेळी टॅप केले गेले होते, की नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितले नाही. देशात फोन टॅपिंगची अनेक प्रकरणे गाजली. त्यातील रामकृष्ण हेगडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
फोन टॅपिेंगचा सरकारला काही प्रकरणात अधिकार असला, तरी सत्तेचा गैरवापर करून विरोधकांवर किंवा पक्षांतर्गत विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असेल, तर तो न्यायालयेही मान्य करीत नाहीत. कर्नाटक सरकारला अशाच एका प्रकरणात एकदा राजीनामा द्यावा लागला. 1988 मध्ये कर्नाटकात रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री होते. त्या वेळी फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आणि हेगडे यांना राजीनामा द्यावा लागला. हेगडे यांच्या सरकारच्या वेळी पोलिस महासंचालकांनी 50 हून अधिक नेते व मंत्र्यांच्या टेप मागवल्या होत्या. वास्तविक, केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते. गांधी यांना बोफोर्स प्रकरणात विरोधकांनी घेरले होते. त्यानंतर हेगडे यांच्या जनता पक्षाच्या सरकारविरूद्ध केंद्राला चौकशी करण्याची संधी मिळाली.फोन टॅपिंगच्या या प्रसिद्ध प्रकरणात हेगडे यांना राजीनामा द्यावा लागला. छत्तीसगडमध्ये अंतागढ़ टॅपकँडही चर्चेचा विषय ठरले होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. अंतागडमधून भाजपने आमदार विक्रम उसंदी यांना तिकीट दिले. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे भाजपचा विजय झाला. त्यानंतर एक टेप व्हायरल झाली. या टेपमध्ये माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा आवाज होता. यात काँग्रेस उमेदवाराचे नाव मागे घेण्यासाठी सात कोटी रुपये देण्याची चर्चा होती. यावर काँग्रेसने तक्रार दाखल केली. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. नीरा राडिया टेप घोटाळ्याची बाब सर्वाधिक चर्चेत आली आहे. प्राप्तिकर विभागाने नीरा राडिया आणि काही राजकारणी आणि कॉर्पोरेट घराण्यांमधील संभाषणाच्या टेप बाहेर आल्या. त्यात काही पत्रकारही सहभागी होते. नीरा राडियावर राजकीय लॉबिंगचा आरोप होता. तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांच्या नावाचाही त्यात उल्लेख होता.